ताज्या घडामोडी

रोजनदारीवर असलेल्या कर्मचार्यांचा लाईन दुरुस्ती दरम्यान विद्युत शाॅक लागुन म्रुत्यु

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

नागभीड: पोलीस स्टेशन अंतर्गत जनकापुर येथील ग्रा. पंचायत रोजनदारीवरील असलेल्या कर्मचार्यांचा लाईन दुरुस्ती दरम्यान विद्युत शाॅक लागुन म्रुत्यु झाल्याची घटना उघडकीस आली. विनोद बारीकराव शेंडे (४५) रा. जनकापुर असे म्रूतकाचे नाव असून तो ग्राम पंचायत चा रोजनदारी वरचा विद्युत कर्मचारी होता, काल दि. ३० आॅगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास शेतशीवारातील लाईन बंद असल्यामुळे, संबंधित विद्युत विभागाचा लाईनमन यानी आपल्याला सहकार्य करण्यासाठी विनोद ला सोबत घेतला होता, दरम्यान लाईनमन हा डीपीवर फाल्ट बघत होता , आणि विनोद ला थांब्यावर चढून फाल्ट बघायला सांगितलं , लगेच विनोद थांब्यावर चढला आणि अचानक विनोद ला विद्युत शाॅक लागला व विनोद खाली शेतात पडला , व काही वेळातच विनोद चा म्रुत्यु झाला. यीची माहिती नागभीड पोलीसांना मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा व उत्तरीय तपासणी करुन प्रेत घरच्यांकडे देण्यात आले, संबंधित विद्युत विभागाचे विनोद च्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. म्रूतकाला आई व २मुली आहेत. पूढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close