चिमूर तालुक्यातील आंबोली पं. सं.क्षेत्रातील पुयारदंड गावात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालय व शाखेचे उदघाटन
= शाखेतर्फे जनतेसाठी पाणपोई सुविधा,
= भिसीतील टायगर ग्रुपच्या काही सदस्यांचा व राजमुद्रा प्रतिष्ठान ग्रुप पुयारदंड यांचा शिवसेनेत प्रवेश
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
दि.18 एप्रिल 2022 रोजी चिमूर तालुक्यातील आंबोली पंचायत संमिती क्षेत्रा मधे पुयारदंड गावात विभाग प्रमुख राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय तथा शाखा उदघाटन करून जनतेसाठी पाणपोई सुविधा शाखा पुयारदंड च्या वतीने चालू करण्यात आली.
या उपक्रमात भिसी नगरातील सक्रिय टायगर ग्रुपच्या काही इच्छुक युवकांनी व पुयारदंड येथील राजमुद्रा प्रतिष्ठान च्या सर्व सदस्यांनी चंद्रपूर जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश घेतला.
यावेळेस शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे, युवा सेना जिल्हा सरचिटणीस तथा,शिवसेना वरोरा तालुका संघटक मनीष मुरली जेठानी, उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते,तालुका प्रमुख बाळूभाऊ सातपुते,चिमूर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोंबरे,तालुका संघटक रोशन जुमडे,विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, युवासेना उपजिल्हा प्रमुख राज बुच्चे भिसी शहर प्रमुख नाना नंदनवर प्रसिद्धी प्रमुख सुनील हिंगणकर असे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा प्रमुख यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन चिमूर परिसरातील आंबोली क्षेत्रात येणाऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळवायचे असेल तर प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा व घर तिथं शिवसैनिक झाल्याशिवाय आपण आपल्या पक्षाला बळकटी येणार नाही असे वक्तव्य करीत सर्वांना पक्ष वाढीसाठी व शाखा उदघाटन साठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व पदाधिकारी यांनी आपल्या भाषणतून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू असे आश्वसन देत समोरील शाखा उदघाटन साठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भिसी, पुयारदंड, गडपिपरी, आंबोली, चिचाळा शास्त्री, लावारी परिसरातील सर्व शिवसैनिक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.