हिरकणी पुरस्कार प्राप्त कु. किरण साळवींचे कार्य खरोखरंच कौतुकास्पद -अंजू पिंपले
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक भद्रावती नगरीतील सामाजिक महिला कार्यकर्त्या तथा व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक तथा अध्यक्ष कु.किरण विजय साळवी यांचे कार्य खरोखरंच वाखण्याजोगे व कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं चंद्रपूर कलाकुंजच्या सहसंयोजिका अंजू मुकेश पिंपले यांनी साळवी यांना महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार व हिरकणी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आज या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. उच्च शिक्षित कु.साळवी यांची व्हॅर्चुअस मल्टीपर्पज नावाची सोसायटी भद्रावती नगरीत कार्यरत असून ती संस्था दिव्यांग व्यक्तींना सहकार्य करते .या शिवाय निराधार व विधवा महिलांना वेळोवेळी मदत करते.या पूर्वी देखील कु.किरण साळवी यांना त्यांच्या विशेष व उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यातील विविध संस्थांतर्फे पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.