ताज्या घडामोडी

साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांना इंटरनॅशनल आयडल अवार्ड-२०२१

शिक्षण क्षेञात उत्कुष्ट कामगिरी केल्याबद्दल नाशिक येथे सन्मानित.

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

गडचिरोली सारख्या आदिवासी,दुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील गट साधन केंद्रात कार्यरत असलेले उपक्रमशील विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल निर्माण फाऊंडेशन नाशिक च्या वतीने इंटरनॅशनल आयडल अवार्ड-२०२१ ने नाशिक येथे इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सल क्विन मिस शिल्पी अवस्थी,आफ्रिकन अभ्यासक तथा सक्रिय समाजसेवक सान्सी ना बिडान,निर्वाण फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश आंबेडकर,आरती हिरे,विमल बोधरे,डॉ सुरेश देशमुख यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले आहे.
चांगदेव सोरते यांनी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी प्रभावी आणि परिणामकारक कार्य केले आहे.सोबतच नियमित विद्यार्थी-शिक्षक यांना आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून शैक्षणिक सहाय्य करण्याचे मौलिक कार्य केले आहे.आतापर्यत अनेक शिक्षक प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.महाराष्टातील बारा जिल्ह्यातील शिक्षण परिषदांना त्यांनी जवळपास सत्तर ते ऐंशी हजार शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.त्यामुळे त्यांना आतापर्यंत अनेक संस्था व संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहेत.त्यामध्ये गुरू गौरव,भामरागड भुषण,आयकाॅन ऑफ साऊथ गडचिरोली,प्रेरक अधिकारी,गुणवत्तेचे शिलेदार, आदर्श साधनव्यक्ती,राज्य स्तरीय अध्यापक पुरस्कार,बालरक्षक सारखे इत्यादी पुरस्कार देऊन सोरते यांचा गौरव केल्या गेला आहे.
त्यांनी आपल्या सन्मानाचे श्रेय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली,विद्यार्थी ,शिक्षक,पालक ,अधिकारी गण,आप्तेष्ट व मित्रपरिवार यांना दिले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close