इंदाराम येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले स्पर्धेचे उदघाटन…
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी येथून ७ की.मी. अंतरावरील इंदाराम येथे जय पेरसापेन क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन आ.राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी.जि.प.अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष शाहीनभाभी हकीम,बबलुभैय्या हकीम,माजी सरपंच नामदेव आत्राम,पोलीस पाटील सदाशिव दुर्गे,रामबाई मडावी,मनोज आत्राम,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघाटन आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी खेडाळू तसेच नागरिक यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशवीतेसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे अध्यक्ष रुपेश सडमेक, उपाध्यक्ष बंडी सडमेक सचिव किशोर मडावी, सहसचिव बबन तलांडे,कोषध्यक्ष गणेश मडावी,क्रिडा प्रमुख पंकज सिडाम, सामाजिक कार्यकर्ते सीताराम आत्राम, शैलेश गेडाम, तिरुपती मडावी, संतोष पुसलवार, यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन राधेश्याम गोबडे, आभार सतीश गोंगले यांनी मानले.