श्रीधर दुग्गीरालापाठी यांना पत्रमहर्षी मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पुरस्कार
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व दैनिक मराठवाडा साथीच्या वतीने सकारात्मक लेखनासाठी दिल्या जाणाऱ्या पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर चे पत्रकार श्रीधर दुग्गीरालापाठी यांना रविवारी औरंगाबाद येथे प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे वितरण १६ जानेवारी रोजी सायंकाळी वर्षा हाटेल इन मध्ये केंद्रीय राज्यमंत्री ना.विश्वनाथ कराड यांच्या हस्ते करण्यात आले.पत्रमहर्षी मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात ना.डॉ.भागवत कराड यांच्यासह जलदुत शिवरतन मुंदडा तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.वसंत मुंडे, डॉ.प्रभू गोरे, जगदीश बियाणी व चांदूलाल बियाणी उपस्थित होते.
सकारात्मक लिखाणासाठी दरवर्षी पत्रमहर्षी मोहनलालजी बियाणी स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार देण्यात येतात. यातूनच पूर्व विदर्भातुन गडचिरोली जिल्ह्याचे अतिदुर्गम नक्षल माहेरगाव म्हणून ओळखले जाणाऱ्या कमलापूर चे श्रीधर दुग्गीरालापाठी यांना पुरस्कार देण्यात आला.