ताज्या घडामोडी
गणपती विसर्जन व ईद ए मिलाद सणानिमित्त खड्डे बुजून पथदिवे तत्काळ सुरू करा :- नुमान चाऊस
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
बीड जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे निर्माण झाले असून येत्या दोन दिवसात गणपती विसर्जन आणि ईद-ए-मिलाद हे धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे हजारो लोक रस्त्यावर येत असल्याकारणाने जिल्ह्यातील गणपती विसर्जन व ईद ए मिलाद सणानिमित्त जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे बुजून जिल्ह्यातील सर्व शहरातील पथदिवे तात्काळ सुरू करावेत व नागरिकांची होणारी गैरसोय थांबवून नागरिकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तथा मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.