आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी भरपावसात घेतल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांशी केला सवांद
पंचनाने करण्याचे शासकीय यंत्रणे स दिले निर्देश
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी चिमूर तालुक्यातील आठ दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांची नुकसान झाली व काही घरांची पडझड झालेल्याची प्रत्यक्ष पाहणी केली आणि उपस्थित शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंबंधि निर्देश दिले. शेतकरी, शेतकरी तसेच घरे पडलेल्या नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला.
मागील आठ दिवसा पासून सतत धार मुसळधार पावसाने नदी नाल्यात पूर आल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असून काही घरे पडझड झाली. तेव्हा आमदार बंटी भांगडिया यांनी दिनांक २७ जुलै ला चिमूर तालुक्यातील सातारा, मासळ, करबडा, मदनापूर, विहिरगाव, नेरी, लोहारा, आंबोली, गावातील शेतीची व पडलेलल्या घराची पाहणी करीत व जामगांव कॅनल फुटला असल्याने शासकीय यंत्रणा ला पंचनामे करण्याचे निर्देश दिले. पूरग्रस्त पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसान भरपाई मिळवून देण्याचे शब्द दिला.
या पीक पाहणी व घर पडझड दौऱ्यात भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव मनिष तुंम्पलीवार, जेष्ठ नेते घनश्याम डुकरे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष संजय नवघडे, युवा नेते समीर राचलवार, माजी जिप सदस्य डॉ देवनाथ गंधारे,असिफ शेख,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मंगेश धाडसे, सरपंच गजानन गुळधे सातारा,सरपंच अरविंद राऊत चिचाळा शास्त्री, नेरी भाजप जिप प्रमुख संदीप पिसे नेरी, भिसी भाजप जिप प्रमुख निलेश गभणे भिसी , शंकरपूर भाजप जिप प्रमुख अविनाश बारोकर मासळ भाजप जिप प्रमुख प्रवीण गनोरकर टेकेपार युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे, तालुका महामंत्री रोशन बनसोड, युवा नेते कुणाल कावरे चिमूर युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर अमित जुमडे, बादल बडगे, अनिल शेंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिनकरराव शिनगारे रवी लोहकरे, पिंटू खाटिक, नरेंद्र पंधरे,हरीश पिसे कृष्णा कानझोडे ,निखिल भुते गोलू मालोदे, गोलू भरडकर, नरेंद्र हजारे, लीलाधर बनसोड,विकास भोयर
तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे, तहसीलदार राजमाने,ठाणेदार बाकल,कृषीअधिकारी सरोज सहारे, सिंचाई उपविभागीय अभियंता पी जी मेश्राम,बिडीओ सहारे , तलाठी मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते.