“शिक्षणमहर्षी भाऊसाहेब डाॕ.पंजाबराव देशमुख यांच्या २७ डिसेंबर जयंती निमित्ताने……!”
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
7410744772
२७ डिसेंबर १८९८ या दिवशी जन्माला आलेले भारतमातेचे सुपुत्र भारताचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब डाॕ.पंजाबराव देशमुख यांची आज जयंती…
धार्मिक स्थळांच्या संपत्तीचे राष्ट्रीयकरण करुन ती गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी,त्यांच्या उद्धारासाठी खर्च करावी असे बील मांडणारे,शेतकऱ्याच्या मुलाला आरक्षण मिळाले पाहिजे हा आग्रह धरणारे, संविधानात ओबीसींच्या आरक्षणासाठी तरतुद करावी म्हणून डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली असता सुचवायच्या अगोदरच बाबासाहेबांनी ओबीसीच्या ३४० व्या कलमाचा ड्राफ्ट तयार केल्याचे बघून गहिवरुन डोळ्यात पाणी आणनारे, या देशात पहिले जागतिक कृषिप्रदर्शन भरविणारे,देशाच्या विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून ग्रामीन भागातील गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी आपले घर गहान ठेवून श्री शिवाजी शिक्षण संस्थांची निर्मिती करुन ३०० च्या वर ग्रामीण भागात शिक्षणसंस्था सुरु करणारे, पहिले राष्ट्रीय शैक्षणिक अधिवेशन भरवून शैक्षणिक अधिवेशनांची सुरुवात करणारे, घटना समितीचे सदस्य,भारताचे पहिले कृषिमंत्री,सहकारमंत्री,कृषि विद्यापीठाचे जनक, कृषिरत्न,शेतकयांचे कैवारी, शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख यांनी देशासाठी भरीव असे योगदान देवून १० एप्रिल १९६५ ला भारत मातेच्या या सुपुत्राने अखेरचा श्वास घेतला.
या आपल्या महापुरुषांच्या महान कार्याची प्रेरणा सदैव भारतीयांच्या मनामनात राहावी, या आपल्या महापुरुषांचं समाजसेवेचं व्रत असचं पुढे चालविण्यासाठी युगपुरुष शिवश्री अॕड.पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी भारतात सुख समृद्धी शांती नांदावी, देशाचं कल्याण व्हावं यासाठी “मराठा सेवा संघ” नावाची महान पुरोगामी चळवळ उभी केली. या चळवळीला गती देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी आपापल्या क्षेत्रात या चळवळीचं काम जोमाने पुढे न्याव या दृष्टीने ३३ कक्ष निर्माण केले. या कक्षांद्वारे देशपातळीवर विधायक असे कार्य सुरु आहे. त्यातलाच एक कक्ष शिक्षकांचं संघटन या आपल्या महापुरुषाच्या नावाने “शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद हा कक्ष निर्माण केला आहे. हा कक्ष राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. या कक्षाच्या माध्यमातून अनेक विधायक कार्य सुरु आहे, शिक्षकच खऱ्या अर्थाने समाजाला योग्य दिशा देण्याच कार्य करीत असतो त्यामुळे भारताचं महासत्ता होण्याच स्वप्न शिक्षकच पूर्ण करु शकतो यावर मराठा सेवा संघाचा विश्वास आहे,त्यासाठी विवेकशील विज्ञानवादी पिढी तयार करणे आवश्यक आहे तरच हे स्वप्न पूर्ण होवू शकते, हे कार्य शिक्षकाच्याच हातून घडू शकते त्यादृष्टीने शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद कार्य करत आहे,फक्त शिक्षकांच्या भौतिक समस्या सोडविने एवढ्यापूरतेच मर्यादित काम या कक्षाचे नसून शासनाला शैक्षणिक गुणवत्ता,अभ्यासक्रम निश्चीतीत दिशानिर्देश देणे,देशाच्या धर्मनिरपेक्षतेला एकात्मतेला व बंधुभावाला बाधा येईल अशा अभ्यासक्रमातील घटकावर आक्षेप नोंदवून शासनाच्या निदर्शनास आणून समाजजागृती करने.अभ्यासक्रमातून वैज्ञानिक दृष्टीकोन,अंधश्रद्धानिर्मुलन या मुल्याच्या जपनुकीसाठी पाठ्यक्रम मंडळावर नियंत्रण ठेवणे त्याचप्रमाणे शिक्षणक्षेत्रावर जास्तीत जास्त आम बजेटमध्ये तरतुदीसाठी आग्रही असने आदी कार्य या कक्षाच्या माध्यमातुन होत असून शासनाला वेळोवेळी बाध्ये केले आहे.त्यामुळे या संघटनेकडे शासन एक मार्गदर्शक शिक्षक संघटना म्हणून राष्ट्रीय पातळीवर ओळखली जाते. शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन तथा सर्वांना त्यांच्या जयंती दिनाला शिवशुभेच्छा.
✒️ रामचंद्र सालेकर
राज्यउपाध्यक्ष शिक्षणमहर्षी डाॕ.पं.दे.शिक्षक परिषद महाराष्ट्र