चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना नळजोडनीच्या खोदकामामुळे नाहक त्रास
निखिल डोईजड़ यांचे उपविभागीय अधिकारी मार्फ़त नगर विकास मत्र्यांना निवेदन.
तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमूर
चिमुर नगर परिषद अंतर्गत एमजीपी मार्फ़त सुरु असणाऱ्या नळजोड़निच्या खोदकामामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या विषयाची दखल घेत युवक कांग्रेस अध्यक्ष निखिल डोईजड यानी नगर विकास मंत्री, जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांना उपविभागीय अधिकारी मार्फ़त निवेदन दिले.
चिमुर नगरपरिषद परिसरात एमजीपी मार्फ़त कंट्रातदार नळ जोड़नीचे काम मागील काही महिन्यापासुन अत्यंत संथ गतिने सुरु आहे. या कामासाठी चिमुर शहरात प्रत्येक रोड व गल्लीत खोदकाम सुरु असल्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. तसेच येणाऱ्या पावसामुळे आरोगयाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, अत्यंत दिरनगाइने सुरु असलेल्या समस्यावर तातडीने तोड़गा काढण्याकरीता उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ याणा निवेदन देण्यात आले, नागरिकांना होत असलेल्या त्रासावर लवकर तोड़गा न निघाल्यास युवक कांग्रेस तर्फे आंदोलन करण्याचा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला.
यावेळी चिमुर तालुका युवक कांग्रेस अध्यक्ष निखिल डोईफोड़े, शहर अध्यक्ष बंटी शिंदे, गौरव पाटिल, आदित्य कडु उपस्थित होते.