नदी घाटावरुन पाय घसरला ,शरीराला इजाही पोहचल्या पण अखेर विजय मत्तेंने रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
पटवारी ते मंडळ अधिकारी असा प्रवास करणारे विजय मत्ते हे नांव चंद्रपूर जिल्ह्याच्या महसूल विभागात चांगलेच परिचित आहे.सध्या ते पोंभूर्णा तालुक्यात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.मत्ते या भागात नविन जरी असले तरी अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी ते पुढे सरसावले आहेत.नुकतेच त्यांनी तालुक्या अंतर्गत येत असलेल्या एका रेती घाटावर मध्यरात्री जावून अवैध रेतीचे वाहने पकडण्यांचे धाडस केले.या रेती घाटावरुन मंडळ अधिकारी विजय मत्ते यांचा पाय घसरला, त्या वेळी त्यांच्या हाता पायाला व कमरेला किरकोळ दुखापत झाली पण मत्ते यांनी त्याची पर्वा न करता तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली रेतीचे अवैध तीन वाहने पकडली.सध्याच्या परिस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती चोरुन नेण्याचे प्रमाण जरी वाढली असली तरी गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाचे पथक व खनिकर्म विभाग पथक प्राणाची पर्वा न करता मध्यरात्री अश्या अवैध गौण खनिज वाहनांवर कारवाया करीत आहेत.हे मात्र तेव्हढेच खरे आहे.महसूल विभाग , खनिकर्म विभाग ,वनविभाग व पोलिस विभाग यांचे एक फिरते संयुक्तीक पथक निर्माण केल्यास निश्चितपणे चंद्रपूर जिल्ह्यातील मुजोर रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या जावू शकते असे स्पष्ट मत मंडळ अधिकारी विजय मत्ते यांनी काल चंद्रपूर मुक्कामी एका भेटी दरम्यान या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.