ताज्या घडामोडी

पञकार लक्ष्मण उजगरे यांना पितृशोक

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

पाथरी येथील सम्यक संगरचे संपादक लक्ष्मण उजगरे यांचे वडील सुदाम उजगरे यांचे रह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखद निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात पोहेटाकळी येथे काल दिनांक 22 रोजी राञी अंत्यसंस्कार करण्यात आले. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता सुदाम उजगरे यांना राहत्या घरी पोहेटाकळी येथे असतानाच रह्दयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. पञकार लक्ष्मण उजगरे, धम्मा उजगरे यांचे ते वडील होते. तर आदर्श शिक्षक सदाशिव भालेराव यांचे ते मेहुणे होते. मृतयूसमयी त्यांचे वय साठ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
अत्यंत शांत. मनमिळाऊ असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने सर्वञ हळहळव्यक्त होत आहे.
26 रोजी जलदानविधी
दरम्यान दिनांक 26 ऑगस्ट गुरुवार रोजी कालवश सुदाम उजगरे यांचा जलदानविधी कार्यक्रम पोहेटाकळी येथे दुपारी 12 वाजता होणार आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close