ताज्या घडामोडी

प्रा.प्रकाश घोडमारे यांचे अहेरी उपविभागातील क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान त्यांनी शरीराने व मनाने सेवानिवृत्त होवु नये:एम.एल.मद्देर्लावार

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

आलापल्ली : महाविद्यालयीन स्तरावर प्राध्यापकांची नोकरी करीत असताना विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास करण्याची संधी ज्याला प्राप्त होते व त्यानुसार त्या संधीचे जो सोन्यात रूपांतर करतो अशा अहोरात्र विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या प्राध्यापकाने वयानुसार महाविद्यालयातून सेवानिवृत्त व्हावे लागले तरी शरीराने व मनाने सेवानिवृत्त होऊ नये असे प्रतिपादन धर्मराव शिक्षण मंडळ अहेरीचे सचिव एम.एल. मदेर्लावर यांनी केले.
स्थानिक राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय येथे कार्यरत प्रा. प्रकाश नारायण घोडमारे (डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन) हे दिनांक ३० जून २०२१ ला सेवानिवृत्त झाले. त्या प्रित्यर्थ आयोजित केलेल्या सेवागौरव सन्मान समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. यू. टिपले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निरज खोब्रागडे, डॉ. रामदास कुबडे तसेच उज्वलाताई घोडमारे, डॉ. आर. डब्ल्यू. सूर, प्रा. डी. टी. डोंगरे, प्रा. पी. एम. सूर्यवंशी, प्रा. एच. के. राजूरकर, प्रा. एस. बी. बेज्जनीवार, प्रा. जी. ई. कुमरे, प्रा. आर. आर. ढवळे, प्रा. आर. जी. नन्नावारे, प्रा.ए.एस. मद्दीवार, प्रा. एल.जे. वैद्य उपस्थित होते.
प्रा. घोडमारे यांच्या योगदानामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय विद्यापीठ स्तरीय व आंतर विद्यापीठ स्तरीय व्हॉलीबॉल व मैदानी क्रीडा स्पर्धेत धर्मराव विद्यालय नागेपल्ली येथील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत, वनविकास महामंडळ आलापल्ली येथील कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने क्रीडा अधिकारी गडचिरोली यांच्या तर्फे शाल श्रीफळ व स्वामी विवेकानंद स्मृतिचिन्ह देऊन तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई दुधबळे यांच्या तर्फे तसेच महाविद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एम. यु. टिपले यांनी प्रा. घोडमारे यांनी महाविद्यालयासाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच गरजेनुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत राहतील असे भावनिक आव्हान केले. डॉ. खोब्रागडे व प्रा. नन्नावरे यांनी त्यांच्या महाविद्यालयीन कामगिरीवर तसेच वैयक्तिक जीवनशैलीवर प्रकाश टाकला.
प्रा. घोडमारे यांनी महाविद्यालयास संत गाडगेबाबा स्वामी विवेकानंद व भारत मातेची प्रतिमा सप्रेम भेट दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पी. डी. सोनुले तर आभार प्रदर्शन प्रा. एस.टी. गंपावार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन.व्ही. मत्ते, व्ही. एस. उईके, एस. एल. दुर्गे, के. बी. साईनवार, डी. एन. देवाळकर, पी. व्ही. तलांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close