मासोळीच्या रुद्रावताराणे मरडसगावं, गोपा शिवारात पिकांचे नुकसान
सखाराम बोबडे पडेगावकर घेतायेत शेतकऱ्यांच्या भेटी
जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी
मरडसगाव वाघलगाव शिवारातून वाहणाऱ्या मासोळी नदीच्या रुद्रावताराणे पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परभणी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांनी सोमवारी या परिसरातील आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या.
गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव, गोपा, वाघलगाव या भागातून वाहणाऱ्या मासोळी नदीला खूप मोठा पूर आला. यामुळे या नदीचे पात्र रुंदावले. पाण्याने परिसरातील शेकडो हेक्टर जमिनी पाण्याखाली गेल्या. यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेले .परिसरातील शेतकऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी सोमवारी नदीकाठच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली .शेतकरी नारायण सरोदे यांच्या शेतात जाऊन सोयाबीन या पिकाची पाहणी केली. यावेळी भागातील शेतकरी बाबुरावजी शिंदे, वाघलगावचे माजी सरपंच नारायणराव धनवटे, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव उपस्थित होते. उद्या मंगळवारी सकाळी गोपा व नरळद शिवारात शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या जाणार आहेत.