ताज्या घडामोडी

बिलकिस बानोच्या मोकाट ११ बलात्काऱ्यांना गजाआड करा

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पाथरी येथे आंदोलन.

तहसीलदार यांचे मार्फत पंतप्रधान मोदी यांना निवेदन.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

बिलकिस बानोच्या ११ बलात्कारी दोषी आसतांना गुजरात सरकाने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी त्यांची सुटका केली त्यांना तातडीने गजाआड करण्यात यावे या मागणीसाठी पाथरी येथे महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा भावनाताई अनिलराव नखाते यांचे नेतृत्वाखाली महिला पदाधिकाऱ्यांनी २७ आँगष्ट रोजी आंदोलन करून याबाबत तहसीलदार यांचे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे.
परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई अनिलराव नखाते यांचे नेतृत्वाखाली पाथरी शहरात २७ आँगष्ट रोजी बिलकीस बानो ला न्याय मिळण्यासाठी घोषणाबाजी करुन फलकाद्वारे निषेध नोंदवून आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार यांचे मार्फत दिलेले निवेदन तहसिल प्रशासन प्रतिनिधी एस.बि.खट्टे यांनी स्विकारले आहे. यामध्ये गुजरातमध्ये २००२ साली नरसंहार झाला.त्यापैकी बिलकीस बानो ही एक पिडीत आहे तिच्यावर ११ जणांनी सामूहिक बलात्कार केला. तिच्या ३ वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा निर्दयीपणे खून करुन अवघे कुटुंब संपविले. परंतू हिंम्मत न हारता बिलकिस बानोने प्रदिर्घ न्यायालयीन लढा दिला. या लढ्याला यश आले आणि मुंबईमध्ये विशेष सीबीआय न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने११ नराधमांना जन्मपेठेची शिक्षा सुनावली. बिलकिसला न्याय मिळाला असे वाटले होते.पण देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात महिलांच्या सन्मानाच्या घोषणा सायंकाळ पर्यंत हवेतच विरळून गेल्या आणि गुजरात सरकारने बिलकिस बानोच्या ११ बलात्काऱ्यांची नियमबाहय सुटका केली. हे कृत्य केवळ असंवैधानिकच नाही तर मानवतेला काळिमा फासणारे असून न्यायिक व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारे आहे.बलात्काऱ्यांची सुटका करण्याची नियमांमध्ये कुठलीही तरतूद नसताना गुजरात सरकाने हा निर्णय घेतला या संदर्भात केंद्र सरकाने लक्ष घालावे या मागणीसाठी पाथरीत हे आंदोलन शनीवारी करण्यात आले.या आंदोलनात राकाँ महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, मीराताई सरोदे, मिराताई वानखेडे, रेखाताई मनेरे, रेणुका ताई सावळे, मंगलताई सुरवसे, अहिल्याताई तूपसमिंद्रे,विष्णु काळे,शेख खालेद,वैजनाथ महिपाल,रामराव धर्मे,अलोक चौधरी,सुनिल उन्हाळे,शाखेर सिद्धीकी,नितेश भोरे,अहेमद आतार,अमोल भाले,आंगद कोल्हे,रामभाऊ राठोड, प्रमोद हारकळ,मधुकर काळे,सुलतान खान,यासिन पठाण,निलेश कांबळे,शेख मोहम्मद,नदेम खाँन यांचा पुढाकार होता.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close