ताज्या घडामोडी
विहिरगाव येथे मुलाने गळफास घेत केली आत्महत्या
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथील रोशन महादेव दडमल (२२) असे या मुलाचे नाव आहे.विहिरगाव येथील टेलरिंग चा व्यवसाय करणाऱ्या महादेव दडमल यांचा तो एकलुता एक मुलगा आहे.
रोशन सायंकाळी घरात खोलीत ऑनलाइन अभ्यास करीत होता,आज सकाळी 11 वाजता तर त्याची आई आणि बाबा शेतावर गेले होते.आप्तेष्ट आल्यानंतर त्यांनी आवाज दिला असता दार आतून बंद असल्याने संशय आला खडकीतून डोकावून पाहिले असता रोशन दोरीच्या साहाय्याने त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.उत्तरीय तपासणी करिता शवविच्छेदन करीता प्रेत चिमूर येथे नेण्यात आले.असून
घरच्या लोकांनी पोलीस स्टेशन याप्रकरणी माहिती दिली.पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.