वाहनगांव येथे श्री गुरु गोबिंद सिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
चिमुर तालुक्यात वाहनगांव येथे आज दी.५.१.२०२२रोजी सिख सिकलगर बांधवांनी मोठ्या उत्साहात गुरुगोविंद सिंग यांची जयंती साजरी केली जो बोले सो निहाल’, ‘सत श्री अकाल’ अशा जयघोषात, उत्साहपूर्ण वातावरणात गुरू गोविंदसिंग यांची जयंती वाहनगांवात साजरी करण्यात आली.
शीख धर्मियांचे दहावे धर्मगुरु श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्या जयंती निमित्त अखंड पाठ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रम दरम्यान
श्री गुरुगोविंद सिंग यांचे विचार मांडण्यात आले आणि सगळ्या सिख बांधवांनी गुरुगोविंद सिंग जी यांच्या विचार अमलात आणून आपला जीवन व्यतीत करावे असे उपदेश देण्यात आले
धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंह यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करुन समानता प्रस्थापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावण्याचे महत्वपूर्ण काम श्री गुरु गोविंद सिंग यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन गुरुद्वारा श्री गुरु ग्रंथ साहिब प्रबंधक कमेटी वहानगांव यांनी केले तीन दिवस चाललेल्या अखंड पाठ मध्ये सेवा देणारे ग्यांनी अखंडपाठी नाव १ हरदिपसिंग अंधरेले ठानेगांव २ राहुलसिंग बावरी पवनी ३ कमलसिंग दुधानी मेंडकी ४ गुरुबचनसिंग वर्धा ५ अरविंदसिंग अंधरेले वहानगांव यांचे स्वागत करण्यात आले तसेच कीर्तनकार
रागी जथा १ चतरसिंग परदेशी २ समरतसिंग परदेशी ३ युवराजसिंग परदेशी पुनावाले यांचे स्वागत रतन सिंग अंधरेले , कमल सिंग अंधरेले यांनी केले अखंड पाठ कार्यक्रमाची समाप्ती नंतर लंगर करण्यात आले या कार्यक्रमामध्ये जवळपास परिसरातील सिकलिगर शिख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले .
कार्यक्रमाला सतीश भाऊ वाराजूरकर व शेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार पीएसआय यांची उपस्थिती लाभली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुद्वारा श्री गुरु ग्रंथ साहिब वहानगांव रतन सिंग अंधरेले प्रधान अंधरेले, नानकसिंग अंधरेले व समस्त वाहनगांव शीख परिवारांनी केले व सर्व आलेले मंडळींचे आभार मानले