मानवत येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न

अ.सत्तार मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे स्पर्धेचे आयोजन.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
जगात अनेक खेळ खेळले जातात. आपल्या जीवनातील खेळाचे महत्व प्रत्येकाला माहित आहे. यांपैकी. कबड्डी, खो-खो, बेसबॉल हे खेळ आपणा सर्वांना माहित आहेत…परंतु काही खेळ असे आहेत जे फक्त खेळ नसून आपल्याला लढायला शिकवतात. आपला बचाव करतात.

असाच एक खेळ ते महणजे कराटे चे प्रशिक्षण स्वयं रक्षणाकरिता घेतल्या जाते आणि ज्याच्या विविध स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात
त्याच एक भाग म्हणून सतत दुसऱ्या वर्षी
मानवत येथे भव्य राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन अब्दुल सत्तार मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली माहेश्वरी मंगल कार्यालय येथे दिनांक 20 मार्च रोजी घेण्यात आले.. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले
यामध्ये राज्यातील अनेक कराटे खेळाडू ने सहभाग नोंदविला या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते डॉक्टर अंकुश लाड, विधी तज्ञ गणेश मोरे ,माजी नगरसेवक सय्यद जमिल,डॉ. कुमावत, यांच्या हस्ते करण्यात आले……
प्रमुख पाहुणे फेरोज पठाण,चंद्रमनी डोगरे मास्टर, सय्यद मुसा मास्टर , सुलतान मुजावर मास्टर, माजित मास्टर, फेरोज मास्टर ,याची उपस्थिती होती… सुत्रसंचालन विलास खरात यांनी केले.. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मानवत येथील मास्टर स्पोर्ट अकॅडमी ने परिश्रम घेतले….