ताज्या घडामोडी
यंग ब्रिगेड तर्फे विठ्ठलवाड्यात निर्जंतुकीकरण

प्रतिनिधी:महेश शेंडे
विठ्ठलवाडा
कोरोनाने संपूर्ण देशात अक्षरशः कहर माजविला असून दिल्ली पासून ते गल्लीपर्यंत कारोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे.गोंडपिपरी तालुक्यात वाढती रुग्णसंख्या लक्ष्यात घेता यंग ब्रिगेड गोंडपिपरीचे तालुका अध्यक्ष सुरजभाऊ माडुरवार यांच्या पुढाकारातून विठ्ठलवाडा गावात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले.यावेळी विठ्ठलवाडा गावचे सरपंच अंकुर मल्लेलवार,यंग ब्रिगेड विट्ठलवाडाचे शाखा अध्यक्ष संतोष उराडे, उपाध्यक्ष भूषण अवथरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.