ताज्या घडामोडी
मिंडाळा येथील जादू टोना करण्याच्या संशयावरून मार खाऊन लापता झालेला इसम दहाव्या दिवशी घरी परतला
तालुका प्रतिनिधी : कल्यानी मुनघाटे नागभीड
नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत मिंडाळा येथील ईसम जादू टोना करून पैसे गायब करण्याच्या संशयावरून मार खाऊन लापता झाला होता. तो लापता पिडीत ईसम काल दहाव्या दिवशी घरी परतला. मिंडाळा ( टोली) येथे जादू टोना चे कारणांमुळे झालेल्या मारहाणीत जखमी झालेला अशोक उपासराव कामठे (५१) हा काल दी. ९ सप्टेंबर रोजी नागभीड तालुक्यातील वाढोना येथे आपल्या बहीणी च्या घरी नागभीड पोलीसांना मीळुन आला . त्याला पोलीस स्टेशन नागभीड येथे आणुन त्याचे घटनेबाबत बयान नोंदवून त्याचे मारहाण बाबतीत ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
व त्याला गावातील पोलीस पाटील यांचे समक्ष त्याच्या घरी सुखरूप पोहचवण्यात आले . त्याचे घरी आई ईंदीराबाई कामठे व बहीण यशोदा नान्हे यांच्या ताब्यात देण्यात आले.