मानवत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने सर्व पोलीस कर्मचारी व पदाधिकारी यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत येथे दि. 1 मे 2024 :- रोजी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने, महाराष्ट्र राज्य,संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ.संघपाल उमरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली , महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मा.सौ, रेखाताई मनेरे ,मराठवाडा अध्यक्ष मा.शेख अजहर हादगावकर सर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा महिला विभाग मा. श्रीमती रेखाताई मनेरे, मराठवाडा संघटक मा.अहेमद अन्सारी सर , जिल्हा सचिव मा.शेख ईफतेखार बेलदार सर ,मा. रईस कुरेशी सर व इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगार दिनाच्या निमित्ताने मानवत पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक श्री मा.दिपक दंतुलवार साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मा. श्रीमती रेखाताई मनेरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन
सत्कार करण्यात आला व शुभेच्छा दिल्या आणि समितीचे कार्य,उदिष्ट ध्येय.धोरण.या विषयी सखोल चर्चा करण्यात आली आणि मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. मा.दिपक दंतुंलवार साहेब यांनी व पोलीस कर्मचारी या.श्री. घोरपडे साहेब, तसेच मा.श्री.गायकवाड साहेब यांनी समितीचे कौतुक केले व आभार मानले
यावेळी पोलीस कर्मचारी मा .श्री.घोरपडे साहेब,मा.श्री.गायकवाड साहेब मा.श्री.नरेंद्र अनंतराव कांबळे ,मा.श्री.पांडुरंग वडकिले साहेब , मा. महिला पोलीस कर्मचारी, मा.सौ.शकुंतला चांदीवाले मॅडम,मा.सौ.मनिषा किशनराव वाकळे मॅडम व इतर सर्व पोलीस कर्मचारी,पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मानवत पोलीस स्टेशन येथे सर्व नागरिकांना व शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुढाकार व परिश्रम पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा श्रीमती रेखाताई मनेरे महिला विभाग यांनी परिश्रम घेतले.