राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत राजमाता जिजाऊ पुणे प्रथम तर शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई द्वितीय
गंगाखेड मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यास मी वचनबद्ध:आ.डॉ.रत्नाकर गुट्टे
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
गंगाखेड मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या आमदार चषक राज्यस्तरीय महिला निमंत्रित कबड्डी स्पर्धा व जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि.२४ फेब्रुवारी रोजी गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे, गंगाखेड शुगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र डोंगरे व जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नरेंद्र पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वतीने व आनंदवन क्रीडा मंडळ यांच्या संयोजनाने राज्यस्तरीय महिला निमंत्रित महिला व जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेचे जायकवाडी वसाहत गंगाखेड येथे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात राजमाता क्रीडा मंडळ पुणे व शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई यांच्यात अटीतटीची लढत प्रेक्षकांना पाहावयास मिळाली. यात राजमाता क्रीडा मंडळ पुणे यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला तर शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आनंदवन क्रीडा मंडळ गंगाखेड या संघाने तिसरे तर शिवशक्ती क्रीडा मंडळ धुळे या महिलांच्या संघाने चौथे पारितोषिक पटकावले.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला नेहमीच भरभरून आशीर्वाद दिले आहेत. या जनतेच्या सेवेकरिता मी माझे आयुष्य वाहून घेतले असून मतदारसंघाच्या सर्वांगिन विकास करण्यास मी वचन वचनबद्ध आहे. गंगाखेड मतदार संघातील शहरासह प्रत्येक गावात खुली व्यायाम शाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, प्रत्येक गावात क्रीडा मंडळ स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करून निरोगी तरुण घडविण्यासाठी मी नेहमीच पुढाकार घेत आलो आहे आणि भविष्यातही घेण्यात येईल. खेळाला प्रोत्साहन मिळावे म्हणून पुढील वर्षी कबड्डी स्पर्धेचे स्वरूप यावर्षी पेक्षाही अधिक भव्य दिव्य असेल असे आमदार रत्नाकर गुट्टे याप्रसंगी बोलताना म्हणाले.
महिलांचे राज्यस्तरीय कबड्डीचे सामने पाहण्यासाठी गंगाखेडसह पंचक्रोशीतील प्रेक्षकांनी अत्यंत गर्दी केली होती यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. राष्ट्रीय समाज पक्ष व आमदार गुट्टे काका मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली व खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे याकरिता बक्षिसांचा वर्षाव ही केला.
आनंदवन क्रीडा मंडळाचे राजेश राठोड, माणिकराव नागरगोजे, अवधूत गिरी,विनोद कुलकर्णी, व्ही.एस. राठोड, बी.यू. कातकडे, एस.यू. राठोड, बडे मॅडम, हळिघोंगडे मॅडम,कल्याणी मॅडम, आंबेकर मॅडम आदीबा परिश्रम घेतले.
आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे महिला कबड्डी खेळास प्रोत्सान मिळेल.