ताज्या घडामोडी

चेतना विद्यालयात एस.एस.सी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर

जी. एम.आर.वरलक्ष्मी फाउंडेशन वरोरा चा स्तुत्य उपक्रम.

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा तालुक्यातील चेतना माध्यमिक विद्यालय मजरा(रै) येथे आज जीएमआर वर लक्ष्मी फाउंडेशन वरोरा व जी एम आर एनर्जी लिमिटेड वरोरा यांच्या सहयोगाने एसएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या मार्गदर्शन शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील विश्वकर्मा,प्रमुख मार्गदर्शक देवेंद्र ताम्हणे सर, वेदांत ताम्हणे, कु. प्रतीक्षा शर्मा मॅडम, माकोडे मॅडम, चेतना माध्यमिक विद्यालयाच्या ढवस मॅडम यावेळेस प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विश्वकर्मा सरांनी एसएससीच्या विद्यार्थ्यांना विशेष मोलाचे मार्गदर्शन केले. ताम्हने सरांनी गणित व विज्ञान या विषयांच्या अध्यापन पध्दती तसेच अभ्यास कसा करावा? व एसएससी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश कसे मिळवता येईल यावर विस्तृत असे मार्गदर्शन केले. यावेळी वेदांग ताम्हणे व प्रतीक्षा मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रेरक असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या कु.देशकर मॅडम यांनी केले. तर ढवस मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close