बे लगाम व मूजोरी करणार्या सर्व ग्रामसेवका वर कार्यवाही करा —प्रहार जनशक्ती पक्ष

(दिव्यांग निधी साठी प्रहार चे आमरण उपोषण)
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
माजलगाव तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने आता पर्यंत 2016/21चा अपंग निधी वाटप केला नाही. त्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनेक वेळा गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले व उपोषण, मोर्च देखिल काढले मात्र प्रत्येक वेळी थातूरमातूर उत्तर देवुन वेळ मारून नेली .आणी एक प्रकारे अपंग बांधवांवर अन्याय केला.विशेष करूण ढोल वाजवून प्रशासनाला जागो करो अंदोलनही केले.तरी पण पंचायत समिती प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पंचायत समिती समोर आज रोजी दि 21/12/2021 आमरण उपोषण करण्यात येत आहे.या वेळी अंदोलन कर्ते गोपाळ पैंजणे ता. अध्यक्ष, नितिन कांबळे ता. उपाध्यक्ष, भारत डोंगरे संपर्क प्रमुख, अविनाश ढगे युवा ता उपाध्यक्ष, अशोक अर्जुन सोशल मीडिया तालुकाप्रमुख, अनिल लोखंडे, मुश्ताक कुरेशी शहराध्यक्ष, अनिल देशमुख सहसंघटक, विकास जगताप, महादेव डाके पांडुरंग कुकडे इत्यादी उपोषणास बसले आहेत विषेश करून अमरावती वरून जिंतुसिंग चिंतोडीया, मिलान चिंतोडीया हे विषेश करुन उपस्थित आहेत .तसेच जो पर्यत दिव्यांग ५% निधी व सबधिंत अधिकार्यांवर जानून बूजूनहू विलंब करणार्या व मूजोरशाही करणार्या अधिकार्यावर जो पर्यत योग्य ती कार्यवाही होणार नाही तो पर्यत हे अमरण उपोषण चालू राहिल असा आक्रमक पाविञा प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्यांनी घेतला आहे.