ताज्या घडामोडी

रस्त्यावरील खोदकाम ठरत आहे जीवघेणे

तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल

मुल तालुक्यापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नांद,गाव ते गोवर्धन या रस्त्यावर मागील काही महिन्यापासून खोदकाम केली असून वाहनांच्या वाहतुकीस अडचणी निर्माण होत आहे. हाच समस्याग्रस्त पर्यायी मार्ग वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे सर्वत्र धुळीची समस्या आजही कायम आहे. याकडे कंत्राटी कंपनी व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष केले असल्याने नियमित या मार्गावर छोटे-मोठे अपघात होताना दिसत आहे. रस्त्याच्या मधोमध खोदकाम केले असल्यामुळे उखडलेली गिट्टी रोडवर अशीच पडून असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. तर या गिटटी वरून गाडी घसरली गेल्यास जीव जाण्याचा धोका असते त्यामुळे वाहनधारकांच्या नाकीनऊ आले आहे. मात्र अनेक महिन्यापासून या मार्गाचे काम बंद असून या मार्गाने मोठ्या प्रमाणात जड वाहतूक भरधाव वेगाने होते. परिणामी मार्गावर मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. यातून वाट काढताना वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवास करणे जीवघेणी कसरत केल्यासारखे आहे. जर बाजुने मोठे वाहन गेल्यास पसरलेली गिट्टी उखडून लागण्याची शक्यता आहे या मार्गाच्या कामाची गती अतिशय मंद स्वरूपाची आहे. मागील अनेक महिन्यांपासून या रोडचे काम बंद पडले आहे. त्यामुळे आणखी किती काळ असा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागेल सांगणे कठीण आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक भरधाव वेगाने होते त्यामुळे पर्यायी मार्गावरून मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे मागच्या वाहनचालकास समोरचे काही दिसत नाही या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्यामुळे दुचाकीवर दोघे बसून प्रवास करीत असले की जीवीतास धोका निर्माण होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close