ताज्या घडामोडी

जुन्या नगर परिषद इमारतीत रक्तपेढी व रुग्णालय नगर परिषद मार्फत सुरू करा – प्रशांत बदकी मनसे

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा शहराची लोकसंख्या जवळपास 75 हजाराच्या आस पास गेली आहे.असे असताना वरोरा शहराची स्वतःची मजबूत आरोग्य व्यवस्था कमकुवत आहे. वरोरा नगर परिषद ही खूप जुनी नगर परिषद असून देखील वरोरा शहरात एकही रक्तपेढी किंवा नगर परिषद चा स्वतःचे रुग्णालय नाही ही शोकांतिका. वरोरा एम आय डी सी क्षेत्रातील असलेल्या कंपनीच्या सी एस आर फंडातील निधी वापरत वरोरा शहरात एक सुसज्ज अस रुग्णालय व रक्तपेढी उभारायला हवी ही काळाची गरज आहे.
साथीचे रोग आल्यानंतर आरोग्य व्यवस्था पार कोलमडून जाते.रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसतो कित्येकांना जिल्हा रुग्णालयात रेफर केले जाते,या सर्व प्रक्रिये मध्ये कित्येकांचे जीव देखील जातात .परंतु त्या वेळेस काहीतरी थातुरमातुर व्यवस्था करून वेळ काढली जाते.मागील वर्षभरापासून आलेला कोरोना काळातही रुग्णालयात जागा नव्हती , रुग्णांना ऑक्सिजन मिळत नव्हत या सर्व गोष्टीपासून बोध घेत एक मजबूत आरोग्य व्यवस्था तयार करणे या गोष्टीला प्राधान्य देणे गरजेचे आहे .वरोरा तालुक्यात कुठे ही अपघात झाला किंवा एखाद्या रुग्णाला रक्त देण्याची वेळ आली की सरळ चंद्रपूर किंवा नागपूर जावे लागते. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा चे तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी यांनी वरोरा शहरातील जुनी नगर परिषद इमारतीत काही जागा ही नगर परिषदेतर्फे एक रक्तपेढी व रुग्णालयाकरिता राखीव ठेवून त्यावर लवकरात लवकर काम सुरू करावे जेणेकरून या भागातील रुग्णाना हाल सहन करत जीव गमवावा लागणार नाही .नगर परिषद प्रशासनाकडून यावर लवकरच अमलबाजवणी करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा प्रशांत बदकी,तालुका उपाध्यक्ष यांनी दिला आहे.निवेदन देतेवेळी अमोल बोडणे महाराष्ट्र सैनिक ,अभिजित अष्टकार ,तालुकाध्यक्ष मनविसे ,मुज्जमील शेख ,जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी सेना ,कुणाल गौरकार शहर उपाध्यक्ष ,मनसे तालुकाध्यक्ष वैभव डहाने,प्रशांत बदकी तालुका उपाध्यक्ष मनसे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close