ताज्या घडामोडी
श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पूरक ‘श्रीं’ ची स्थापना
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
माजलगाव येथे गणेशोत्सवा निमीत्त प्रतिवर्षी प्रमाणे येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पूरक ‘श्री गणेशाची’ स्थापना करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करून महाआरती संपन्न झाली. दि १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सवात दररोज संस्था पदाधिकारी तथा श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे माजी विद्यार्थी यांच्या हस्ते आरती केली जाणार असून अभ्यासपूरक मंडळांतर्गत विविध ऑनलाइन उपक्रम व ऑनलाइन स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. दि. ५ सप्टेंबर रोजी पर्यावरण पूरक गणेश मुर्ती कार्यशाळा संपन्न झाली होती, कलाध्यापक उध्दवराव विभूते यांनी ‘पर्यावरण पूरक गणेश मुर्ती’ यांनी साकारली.
गणेश पूजनावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.