ताज्या घडामोडी

गोंडपीपरी-चंद्रपूर मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर

ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा

दि.28 सप्टेंबर रोज मंगळवारला गोंडपीपरी -चंद्रपूर मार्गावर झरण जवळ झालेल्या चारचाकी व दुचाकीच्या जोरदार धडकेत गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील संदीप गौरकर नामक 24 वर्षीय युवकाचा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.तर घडोली येथील कोमल धुडसे नामक 26 वर्षीय युवकावर उपचार सुरू आहे.
बल्लारपूर कडून आलापल्ली कडे जाणारी वाहन क्र dl 9 cau 9750 ही चारचाकी कोठारी वरून राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना झरण टर्निंगवर
गोंडपीपरी कडून येणाऱ्या दुचाकी क्रमांक mh 34 u 3681 ला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी झाले असता त्यांना उपचारार्थ चंद्रपूर सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
कोठारी पोलिसांनी सायंकाळ च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार जखमी पैकी संदीप गौरकर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. व कोमल धुडसे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
सदर चारचाकी वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत होता. कोठारी जवळ येताच कर्तव्यावर असणाऱ्या रहदारी पोलिसाचा अपघात होता होता टळला.
मात्र झरण जवळच्या टर्निंगवर गोंडपीपरी कडून येणाऱ्या दुचाकी स्वारास जोरधार धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले .सदर माहिती कोठारी पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. जखमींना कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले व पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात रवाना केले.
मात्र जखमींपैकी गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील संदीप गौरकर याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती कोठारी पोलिसांनी दिली आहे.
अपघातातील चारचाकी वाहन चालक एकटाच प्रवास करीत होता असून तो मात्र या अपघातातून बचावला. त्याच्या वाहनात विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.तो मद्य प्राशन करून वाहन चालवीत होता.तो व्यवसायाने अभीयंता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील तपास कोठारी पोलीस करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close