रोखठोक प्रहार कामगार संघटनेच्या भीक मागो आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर चिमूर नगर परिषद लागली कामाला
युवा नेता आशिद मेश्राम यांच्या आंदोलनाला आले यश
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
कागचे तडफदार युवा नेते तथा चिमूर रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे तालुकाप्रमुख अशिद मेश्राम यांचे शिवजन्मोत्सव पासून रास्त मागण्यांबाबत काग मुक्कामी (वार्ड नंबर 10 येथे ) गनीमी कावा आंदोलन सुरू होते.चिमूर नगर परिषद योग्य ती दखल घेत नसल्यामुळे अशिद मेश्राम यांनी दि.1 मार्चला नगर परिषदेच्या विरोधात रोखठोक प्रहार कामगार संघटनेच्या माध्यमातून संस्थापक -अध्यक्ष महेश हजारे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली त्यांनी काग गावासियांना सोबत घेवून भीक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला होता व तशी तयारी देखिल झाली होती.या बाबतीत त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना लेखी सुचना सुध्दा दिली होती.दरम्यान या
आंदोलनापुर्वी सकाळी 11 वाजता महेश हजारे यांची चिमुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक योगेश घारे यांची भ्रमनध्वनीवरुन चर्चा झाली .घारे यांनी तात्काळ नगर परिषद चिमूरच्या मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांना चर्चा करण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनला बोलाविले होते .नगर परिषद चिमूरच्या मुख्याधिकारी राठोड यांनी आपल्या कार्यालयीन स्तरावरील सर्वच मागण्यां मान्य करत ताबडतोब बांधकाम विभागाकडून काग वार्ड नंबर 10 येथील समस्यांची पाहणी करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले.विहिरीतील गाळ उपासण्यासाठी नगर परिषदेने तात्काळ आँर्डर काढली असल्याचे मुख्याधिकारी राठोड यांनी या चर्चा दरम्यान बोलताना सांगितले .स्मशानभूमीसाठी शेड, गावातील नाली अंडरग्राऊंड लवकरच बांधुन देणार असल्याचे समजते.त्यासाठी बांधकाम विभागाकडून तात्काळ पाहणी करण्यात आली.मागेल त्याला तात्काळ नळाचे कनेक्शन मिळेल.असे ही चर्चा दरम्यान ठरले असल्याचे हजारे म्हणाले.
पोलिस निरीक्षक घारे यांनी केलेली मध्यस्थी शेवटी यशस्वी ठरली .रोखठोक प्रहार कामगार संघटनेच्या वतीने या वेळी विभाग प्रमुखांचे आभार मानण्यात आले.विशेष म्हणजे
बहुतेक सर्वच मागण्यांबाबत नगर परिषद चिमूरने सकारात्मक भुमिका घेतल्यामुळे रोखठोक प्रहार कामगार संघटनेच्या वतीने होणारे भीकमागो आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे रोखठोक प्रहार कामगार संघटनेनी स्पष्ट केले आहे.
गनीमी कावा आंदोलनाच्या 12 व्या दिवशी तालुकाप्रमुख अशिद मेश्राम यांच्या संघर्षाला यश मिळाले असे मत संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
तसेच रोखठोक प्रहार कामगार संघटना काग वासियांसाठी संघर्ष करण्यासाठी सदैव तयार असेल असा विश्वास हजारे यांनी त्यांना दिला आहे .
जर नगर परिषद चिमूर कडुन वेळीच कामाला सुरुवात झाली नाही तर काग येथील महिलांच्या नेतृत्वाखाली परत आंदोलन उभे करू असा इशारा हजारे यांनी दिला आहे.