राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेची सहविचार सभा संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी : महेश शेंडे
विठ्ठलवाडा
आदिवासींवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलनाला यशस्वी आणि एक वेगळी दिशा देण्यासाठी दिनांक 26 जून 2021 ला मौजा कन्हाळगाव आणि जैरामपूर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद सहविचार सभा संपन्न झाली.
या सहविचारी सभेमध्ये 29 जुलै 2021 ला देशातील सर्व जील्यामध्ये मान. एच.एल. रेकवाल राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रेमकुमार गेडाम राष्ट्रीय संयोजक राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद यांच्या नेतृत्वामध्ये 21 मुद्यांना अनुसरून विशाल रॅली काढण्याचे ठरविले आहे.
स्वातंत्र्याची 74 वर्षे उलटूनही आदिवासींना वीज,पाणी,पक्के रस्ते,दूरसंचार या साधनापासून वंचितच आहेत.असे अनेक प्रश्नांना अनुसरून ही सभा घेण्यात आली.
या सभेला रवींद्र कोवे महाराज आणि मनोज खोब्रागडे यांनी मनोगत व्यक्त केले.राजेंद्र मडावी,आनंदरावजी कोडापे,बाबुराव कडते,विजय मंगाम, उरकुडाजी मडावी, लहानुजी पोरते,आनंद कोरडे,संघशिल बावणे आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते.