कोल्हारा ग्रा. प. येथे केला जागृती कार्यक्रम
समाजकार्य प्रात्यक्षिक प्रशिक्षणार्थी….
प्रतिनिधीः चंदन पाटील
चिमूर तालुक्यातील दुर्गम भागातील ताडोबा बफर झोन लागून असलेला कोल्हारा (ग्राम पंचायत) येथे आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथील MSW या अभ्यासक्रमांचे विध्यार्थी प्रात्यक्षिक प्रशिक्षणार्थी कोल्हारा या गावात जाऊन दर बुधवार व शनिवारी तेथील समुदायात प्रात्यक्षिक अभ्यासक्रमांचा भाग म्हणून ग्राम सर्वेक्षण ,शिवार फेरी,गाव नकाशा, शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, ग्राम पंचायत, शासकीय कार्यालय, वार्ड सभा, महिला बचत, गावातील इतर मंडळे, व इतर माहिती संकलित करून समुदायाचा आराखडा तयार करून त्यातून समोर आलेल्या समस्याना अग्रक्रम देण्याकरिता गाव सभा घेण्यात आली. तसेच समुदायात समाजकार्य प्रशिक्षणार्थी यांना निदर्शनास आलेल्या समस्यावर निगडित जनजागृती चे कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये पथनाट्यच्या माध्यमातून विविध विषयनव्हे जनजागृती कार्यक्रम व मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमांच्या नियोजनासाठी मौजा कोल्हारा येथील ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आठवले समाजकार्य महाविद्यालयातील समाजकार्य प्रशिक्षणार्थी व महा. पर्यवेक्षक यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम आ. स. म. चि. येथील प्राध्यापकांच्या नेतृत्वाखाली पार पडला.