जि प प्राथ शाळा नांद येथे डॉ आंबेडकर यांना आदरांजली
जि प प्राथ शाळा नांद येथे डॉ आबेंडकर यांना आदरांजली

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून गावातील कचरा गोळा .
प्रतिनिधी:प्रा.विश्वनाथ मस्के
भिवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांद क्रमांक 1( मुले) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून गावातील कचरा गोळा करीत एक स्वच्छतापुरक महामानवाला वेगळी आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी नांद येथील सरपंचा शितलताई राजुरकर, उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहन धारणे, ग्रामपंचायत सदस्य विलास रुईकर, शाळेतील शिक्षक सुभाष नन्नावरे व विद्यार्थी उपस्थित होते.

आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी संपूर्ण भारतात महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी करतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय यासारखी तत्वे देशाचा आज आधारस्तंभ बनलेली आहे. मूलभूत अधिकार, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यावर त्यांनी दिलेला भर भारताला एक मजबूत आणि प्रगतशील सहावी संवैधानिक चौकट देतो. महापरिनिर्वाण दिन हा त्यांच्या न्याय समानता आणि निष्पक्षतेच्या मूल्यावर चिंतन करण्याचा काळ आहे. ज्या आजही भारतावर प्रभाव पाडत आहे. सामाजिक सुधारणांसाठी कार्यरत नेत्यांना जातीभेद अस्पृश्यता दूर करण्यासाठी लढा देत समान हक्क व न्याय व्यवस्था प्रस्थापित करत सतत त्यांनी प्रयत्न केला. इत्यादी मार्गदर्शन शिक्षक सुभाष नन्नावरे यांनी उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिकाऊ प्रशिक्षनार्थी विलास रुईकर यांनी केले.









