पोलीस चौकी, पांढराबोडी, नागपुर येथे भव्य निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी
नागपुर महानगर पालिका, नागपुर यांच्या उपक्रमातुन राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत नगरसेविका डॉ. परिणीता फुके यांच्या प्रयत्नेतुन प्रभाग क्र.१३ येथील अत्त-दिप-भव बुद्ध विहार, पांढराबोडी पोलीस चौकी, पांढराबोडी, नागपुर येथे भव्य निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या भव्य शिबिराचे उदघाटन महापौर श्री दयाशंकरजी तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात नेत्र तपासणी, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, जनरल तपासणी, रक्त तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. सदर तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. सदर आरोग्य शिबिराला प्रभागातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
यावेळी नगरसेवक श्री.अमर बागड़े,नगरसेवक श्री.प्रमोद कौरती,श्री.रवीजी वाघमारे, भाजपा पश्चिम नागपुर अध्यक्ष श्री.विनोदजी कन्हेरे,पश्चिम मंडल महामंत्री श्री.घनश्यामजी चौधरी, श्री.योगेशजी मसराम, वार्ड अध्यक्ष श्री.विजयजी चौरे, महामंत्री श्री. विशाल मांढरे, महामंत्री श्री.ओमकिशोर लिल्हारे,श्री. योगेशजी पाचपोर,श्रीमती.राधाताई पाटील, श्रीमती.प्रतिभाताई वासनिक, श्रीमती.बागड़े ताई,श्री.सागर जाधव,श्री.चंदनजी गुप्ता,श्री.मनोजजी पोतदार तसेच UPHC सेंटर सुदाम नगरी व तेलंगखेड़ी येथील डॉक्टर्स, नर्सेस व आशा वर्कर्स प्रामुख्याने उपस्थित होते.