ताज्या घडामोडी

भर पावसात पिण्याच्या पाण्यासाठी प्रहारचा नगरपरिषदेवर घागर मोर्चा

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

माजलगाव शहरातील दालमील रोड जवळील महेबूब नगर, रहेमत नगर अक्सा मस्जिद येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढण्यात आला. मंगळवार दि. ७ रोजी दुपारी १२ वाजता भर पावसात निघालेल्या या मोर्चात आंदोलकांनी आपल्या डोक्यावर रिकामे हंडे घेऊन नगरपरिषदेच्या कारभाराचा निषेध केला.

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने दिलेल्या निवेदनात गेल्या कित्येक वर्षांपासून वरील वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी नसून तेथील नागरीकांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. येथील नागरिकांनी वेळोवेळी नगरपरिषदला निवेदने ही दिली आहेत. सदरील ठिकाणी पाईपलाईन केली नसल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्यापासून हाल होत आहेत. ही बाब वेळोवेळी नगर परिषदेसमोर मांडण्यात आली आहे. परंतु अद्यापपर्यत कसल्याच प्रकारची दखल घेतली नसल्याने येथील नागरीकांनी मंगळवारी दुपारी नगरपरिषदेवर वाजत मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी डोक्यावर रिकामे हंडे घेऊन नगर परिषदेसमोर ठिय्या मांढत आपल्या मागण्या लावून धरल्या. यावेळी संघटनेचे तालूका अध्यक्ष गोपाल पैजने, उध्यक्ष नितीन कांबळे, शहर अध्यक्ष मुस्ताक कुरेशी,खालेक कुरेशी,आलीशेर कुरेशी, अशोक ढंगे,सरफराज कुरेशी,अल्ताब मोईन कुरेशी,मोबिन कुरेशी, इस्माइल बागवान व इतर उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close