ताज्या घडामोडी
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे मुस्लीम व इतर समाज बांधवांच्या वतीने पोलीस अधीक्षकांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
देशातील कर्नाटक राज्यातील काही शहरातील शाळा महाविद्यालयात राज्य सरकारने मुस्लिम मुलींना हीजाब परिधान करण्यास मज्जाव केला असून हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थिनींना वर्गात एका महिन्यापासून बसू दिले जात नसून या सर्व प्रकाराचा जिंतूर तालुक्यातील बोरी येथील मुस्लिम बांधव व इतर समाज बांधवांच्या वतीने कौसडी फाटा ते पोलीस ठाण्यापर्यंत शांततेत रॅली काढून पोलीस प्रशासनामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन निषेध नोंदविला.
या निवेदनावर नागसेन भेरजे, शेख वसीम, शेख सोहेल, शेरू भाई,शेख उस्मान, मुसव्विर खान, करून नागरे, वहीद पठाण, शेख मुरतुजा, खुद्दुस गुत्तेदार, राहुल कनकुटे, बाबू पठाण, मज्जित कुरेशी, शेख अल्तमश, बाबू बागवान, शेख परवेज जुनेद खान यांच्यासह शेकडो बांधवांचे स्वाक्षर्या आहे.