ताज्या घडामोडी

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास शिक्षक भारती कटीबद्ध : नवनाथ गेंड

शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे

महाराष्ट्रातील शिक्षकांच्या समस्या आमदार कपिल पाटील यांचे माध्यमातून शिक्षक भारती सोडवित आहे.पेन्शनचा प्रश्न,कमी पटाच्या शाळा बंद धोरण,विषयशिक्षकांचा सरसकट वेतनश्रेणीचा प्रश्न ल,१०-२०-३० आश्वासित प्रगती योजना, शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न, एकस्तरचा प्रश्न,आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न आदी प्रश्न प्राथमिक शिक्षक भारतीने सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन हे प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न केला आहे.शिक्षणाच्या हक्कासाठी,शिक्षकांच्या सन्मानासाठी ब्रीदवाक्य असलेल्या शिक्षक भारती संघटनेने नेहमी शिक्षण आणि शिक्षकांच्या हितासाठी लढा उभारला आहे.आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात राज्य कार्यकारिणी सातत्याने प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी केले.ते प्राथमिक शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा शाखेने ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते.मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे,विभागीय सरचिटणीस शरद काकडे,विभागीय उपाध्यक्ष राजू भिवगडे,राजेश जिवतोडे, जयदेव पाठराबे,निर्मला सोनवणे,पुरुषोत्तम टोंगे आदी उपस्थित होते.

संघटनेचे कार्य जास्तीत जास्त शिक्षक बांधवांपर्यंत पोहचवणे आणि संघटनेचा विस्तार करण्यासंदर्भात नवनाथ गेंड यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.या मेळाव्यात चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी नंदकिशोर शेरकी (मूल) यांची निवड करण्यात आली.कार्याध्यक्षपदी जब्बार शेख (राजुरा) यांची फेरनिवड करण्यात आली.नागपूर विभागीय प्रसिद्धीप्रमुखपदी राजाराम घोडके यांची निवड करण्यात आली.जिल्हा महिला अध्यक्षपदी निर्मला सोनवणे(नागभीड) यांची निवड करण्यात आली.सेवानिवृत्त्तीबद्दल संघटनेचे पदाधिकारी डाकेश्वर कामडी, जगदीश बगडे यांचा पुष्पगुच्छ,शाल आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.पतसंस्थेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या गोपाल राऊत यांचाही सत्कार करण्यात आला. मेळाव्याचे प्रास्ताविक सुरेश डांगे यांनी केले.संचालन नंदकिशोर शेरकी तर आभार विलास फलके यांनी मानले.मेळाव्याला शिक्षक भारती पदाधिकारी तथा सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close