सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपची नविन कार्यकारणी घोषीत
संयोजिकापदी चंद्रपूरच्या रंज्जू मोडक तर सहसंयोजिका पदी कोठारीच्या वर्षा कोंगरे यांची नियुक्ती!
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
साहित्य, कला , शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलां व तरुणींना प्रोत्साहन देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या संयोजिका पदी विदर्भातील चंद्रपूरच्या मुळ रहिवाशी रंज्जू मोडक यांची नियुक्ती करण्यात आली तर याच गृपच्या सहसंयोजिका पदी कोठारीच्या वर्षा कोंगरे यांची निवड करण्यात आली असल्याचे या गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे,मेघा धोटे व प्रभा अगडे यांनी आज सांगितले.या शिवाय सहज सुचलंच्या कलाकुंजच्या संयोजिकापदी अंजू पिपले तर सहसंयोजिका पदी चंद्रपूरच्या सोनाली इटनकर यांची निवड करण्यात आली आहे.सहज सुचलंच्या काव्यकुंजच्या संयोजिकापदी राजू-याच्या सुपरिचित कवयित्री सरोज हिवरे तर सहसंयोजिका पदी चंद्रपूरच्या वर्षा मिलमिले यांची निवड करण्यात आली. सहज सुचलं सोशल मिडीयाच्या संयोजिकापदी चंद्रपूर तुकुमच्या मंथना नन्नावरे तर सहसंयोजिकापदी शिल्पा कांबळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.प्रसिध्दी प्रमुखपदी अनुक्रमे वर्षा आत्राम,पुष्पा जुनघरे , रजनी रणदिवे, व शारदा झाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे.गत आठ वर्षांपासून सहजं सुचलं व्हाॅट्सअप गृप कार्यरत असून आज या गृपने आठ वर्ष पूर्ण करुन नवव्या वर्षात पदार्पण केले आहे.