ताज्या घडामोडी

बाल कलाकारांच्या अप्रति‌म नृत्यकलाविष्काराला पालक भारावले

श्रीमती शांताबाई नखाते विद्यालय शिवाजीनगर येथे वार्षिक स्नेहसंमेलन रंगले.

आमदार बाबाजाणी दुर्राणी व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले शानदार उद्घाटन.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

श्रीमती शांताबाई नखाते विद्यालय शिवाजीनगर पाथरी येथे मंगळवारी सायंकाळी ७ वा.आयोजीत केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात शिक्षकांच्या प्रोत्साहनातून बाल कलाकारांनी मुक्तछंदपणे सुप्त कलागुणांना वाव देत सादर केलेले निरनिराळ्या नृत्यकलाविष्काराला पालक अक्षरशः भारावून गेले.
अध्यक्षस्थानी आमदार बाबाजाणी दुर्राणी तर विशेष उपस्थिती म्हणून तहसीलदार सुमन मोरे यांची उपस्थिती होतु.प्रमुख पाहुणे म्हणून न.प.मुख्याधिकारी कोमल सावरे,पाथरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार, सचिव बालकिशन चांडक,रामचंद्र कत्रुवार, विजय दलाल,गट शिक्षणाधिकारी मुकेश राठोड,नारायणराव आढाव,पि.आर.शिंदे ,माजी नगरसेवक गोविंदराव हारकळ,भारतीय स्टेट बँकेचे शाखाधीकारी राजेश हुडेकर,नितीन शिंदे,वाल्मिकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलराव नखाते, सचिव तथा शालेय व्यवस्थापन समीती सदस्य भावनाताई नखाते, संचालक अजिंक्य नखाते, वाल्मिकेश्वर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष आदित्य नखाते यांची उपस्थिती होती.प्रारंभी महर्षी वाल्मिकी ऋषी व पहिले परमवीरचक्र विजेते सोमनाथ शर्मा यांचे प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलनाने स्नेहसंमेलनास प्रारंभ झाला.
गजानना..गजानना.गणराया या बहारदार गितावरील नृत्यकलाविष्कारांने स्नेहसंमेलनास सुरूवात झाली.त्यानंतर काठी अन् घोंगड घेऊ द्या किर..पंजाबी भांगडा,राधा कैसे ना जले…झिंगझिंग झिंगाट..अशा एकापेक्षा एक सरस गाण्याच्या तालावर बालकारांनी सर्वांग सुंदर नृत्यकरून पालकांना मोहीत केले.यावेळी त्यांनी केलेली आकर्षक वेशभूषा,रंगीबेरंगी व्यासपीठ आणि रंगतदार सुत्रसंचालन हे वैशिष्ट्यपूर्ण होते.
मराठमोळी लावणी हे मुख्य आकर्षण ठरले त्याला श्रोत्यांनी वन्समोर ची दाद दिली.एकंदरीत या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांची कल्पकता व नाविन्यपुर्णतेतून विद्यार्थी व शिक्षकांनी घेतलेली मेहनतही दिसुन आली. स्नहेसंमेलन हा रंगमंच नवख्यां बालकरारांना विविधगुणदर्शन या कलाप्रकार पुढे नेणारा ठरणार आहे.हे वार्षिक स्नेहसंमेलन शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्षा भावनाताई नखाते, प्राचार्य किशन डहाळे,मुख्याध्यापक नवनाथ यादव यांचे संयोजनाखाली घेण्यात आले.
प्रास्ताविक प्राचार्य के.एन.डहाळे यांनी केले तर सुत्रसंचालन तुकाराम शेळके,आर.जे.गुंडेकर,बि.एम.चव्हाण यांनी केले तर वाडकर यांनी आभार मानले.
हर्ष ढवळे व राष्ट्रपाल ढवळे यांनी कोरिओग्राफी केली.अग्निशमन व पोलीस प्रशासनाने सहकार्य केले.
यावेळी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेअंतर्गत ईतर शाळेतील शिक्षक यांनी परिश्रम घेतले.तिन तास चाललेल्या कार्यक्रमात शेवटपर्यंत रंगत होती.
नखाते विद्यालय म्हणजे गुणवतेचं भांडार : आमदार बाबाजानी दुर्राणी.
पाथरी व सेलू तालुक्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देणारी वाल्मिकी शिक्षण संस्थेचे शैक्षणिक संकुल हे गुणवतेचं भांडार आहे.यासाठी मुख्याध्यापक,शिक्षक, कर्मचाऱ्यांची मेहनत असली तरी संस्थाचालक अनिल नखाते यांचे उत्तम प्रशासनाचे हे श्रेय आहे.असे आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी बोलतांना सांगितले. याशिवाय विद्यार्थ्यांनी गुणवतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे असे म्हणत त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जिवनातील फिशपाँड कला प्रकाराची आठवण करूण देतांना सांगितले की,त्यावेळी माझी प्रकृती धष्टपुष्ट होती यावेळी माझ्या बाजुला सडपातळ शरीरयष्टी च्या मुलाला उभा केले…आणि बाँर्नविटा के पहिले व बाँर्नविटा के बाद अशी माझी ओळख करून दिली यावेळी एखच हशापिकला.त्यानंतर बालकीशन चांडक यांनी कै.स.गो.नखाते यांनी पाथरी शिक्षण मंडळ व अनिल नखाते यांनी वाल्मिकी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्ञानगंगा आणली असे सांगून महाविद्यालयीन जिवनातील एक मजेशीर किस्सा सांगुन श्रोत्यांना हसवीले.
सिनेकलावंत घडावे यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले : भावनाताई नखाते.
वाल्मिकी शिक्षण संस्थेच्या शाळेतून गरिब ,शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी गुणवंत व सर्वंकष आदर्श नागरीक बनवून तो चार चाकाच्या गाडीतून फिरला पाहिजे असे शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.आत्तापर्यंत १०० हुन अधिक विद्यार्थी एमबीबीएस झाले आहेत. याशिवाय संरक्षण, बँकिंग,माहिती तंत्रज्ञान,प्रशासकीय सेवेत आमचे विद्यार्थी काम पाहत आहेत.यापुढे सिने कलावंताच्या यादीत आमचे विद्यार्थी दिसावे यासाठी हे वार्षिक स्नेहसंमेलनाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असे संस्था सचिव तथा शालेय व्यवस्थापन सतीती अध्यक्षा भावनाताई नखाते यांनी सांगितले.
भाऊ व वहिनी दोघांनी रंग दे बसंती वर धरला ठेका.
बाल कलावंतांच्या सर्वांगसुंदर नृत्य कलाविष्कार सर्वजणं भारावून गेले.वाल्मिकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलराव नखाते व सचिव सौ.भावनाताई नखाते हे दोघेही वेगळ्याच रंगात रंगले.त्यांनी रंगमंचावर येऊन रंग बरसे ..भिगे चुनरी वाले. या गाण्यावर अप्रतिम कपल डान्स केला.श्रोत्यांनी याला वन्समोरची दाद दिली.
शहरवासीयांनी घरबसल्या घेतला आनंद.
वार्षिकस्नेहसंमेलनाच्या आरंभापासून सर्व कार्यक्रम हा युट्यूबवर लाईव्ह प्रसारीत करण्यात आला होता.अनेक शहरवासीयांनी घरबसल्या या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close