कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खेर्डा महादेव येथे समाज प्रबोधनाचा कार्यक्रम
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून खेर्डा महादेव येथील प्रतिष्ठित नागरिक श्री गंगाधरराव आम्ले यांच्या वतीने आध्यात्मिक भारुडांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी घनसावंगी येथील सुप्रसिद्ध भारूडकार तथा कवी श्री ह भ प दत्ता महाराज टरले व सहकारी यांना आमंत्रित केले होते. श्री दत्ता महाराजांनी सांप्रदायिक भारूडातून अंधश्रद्धा निर्मूलन करत समाज प्रबोधनाचे कार्य केले. विकास नखाते यांनी त्यांना मृदंगाची साथ दिली. कार्यक्रमासाठी धनंजय आम्ले, इरफान शेख, प्रमोद होगे, मुबारक शेख, विनायक आम्ले, कृष्णा आम्ले गावातील सर्व युवकांचे आणि विशेष करून भजनी मंडळीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी श्री साईबाबा जन्मस्थान मंदिरचे प्रताप आम्ले, पद्मावती दूध उत्पादन संघाचे चेअरमन शेख खय्युम, पाथरी अर्बन बँकेचे हरीश आम्ले तसेच गावातीलच प्रसिद्ध भारुडकार त्रिंबक महाराज आम्ले यांची उपस्थिती होती. स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, बाल संस्कार व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर दत्ता महाराजांनी मार्गदर्शन केले. सर्व ग्रामस्थांच्या वतीने श्री दामोदर आमले व गणेश सिताफळे यांचे शुभ हस्ते महाराज व त्यांचे सहकारी त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर सर्व गावकऱ्यांना कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावातीलच प्रवक्ते श्री दीपक आम्ले यांनी केले. अशी माहिती गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री गणेश लांडगे यांनी दिली.