फिस्कुटी मध्ये जिवन्नोती अभियान व समता ग्रामसंघा द्वारे घरकुल मार्ट
तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मुल अंतर्गत फिस्कुटी या गावामध्ये समता या ग्रामसंघा द्वारे घरकुल मार्ट उभारण्यात आले आहे. या घरकुल मार्ट मध्ये घर बांधण्याकरिता लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. फिस्कुटी या गावामध्ये घरकुल मार्ट ला भेट देण्यात आली. तसेच एका घरकुल लाभार्थ्याच्या घरी आज गजानन ग्रुप ऑफ कंपनी चे जनरल मॅनेजर श्री बाला सर यांनी भेट देऊन त्यांच्या घराचे Easy mix product वापरून या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्लास्टर मोफत करून देण्यात आले. Easy mix product मध्ये रेती व सिमेंट वापरण्यात आले असून त्याचा उपयोग घर बांधताना जुडाई, प्लास्टर व फ्लोरिंग करिता करण्यात येणार आहे. तसेच या प्रॉडक्ट मुळे वेळ व पैशाची सुद्धा बचत होणार आहे. एक बॅग ही चाळीस किलो ची असून या 40 किलो मध्ये 20 फूट प्लास्टर करण्यात आले. एक बॅग वाहतूक खर्चासह 198 रुपयांमध्ये घरकुल मार्टला ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रॉडक्ट द्वारे घरकुल लाभार्थ्याला प्लास्टर करून देण्यात आले तेव्हा फिस्कुटी गावातील सरपंच श्री नितिन गुरुनुले, गावकरी, ग्राम संघातील महिला, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मुल येथून कु माया सुमटकर तालुका अभियान व्यवस्थापक, श्री प्रकाश तुरानकर तालुका व्यवस्थापक IBCB, श्री हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक, श्री रुपेश आदे प्रभाग समन्वयक सेंद्रिय शेती उपस्थित होते.