नेरी-सिरपूर रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून महिलेचे दागिने लुटले

गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील बिर्या घेऊन चोर फरार .
घटनास्थळी दुचाकी ठेवून चोर पायवाटेने पसार.
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
नेरी तळोधी मार्गावरील नेरी आणि सिरपूर च्या मध्ये पहाडी जवळ रस्त्याच्या बाजूला शेतात एकटीच काम करीत असलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवून गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील बिऱ्या घेऊन अनोळखी आरोपी पसार झाला मात्र मागेतून एक दुचाकी येत असल्याची बघून आरोपी ने स्वतःची दुचाकी घटनास्थळी ठेवून पहाडीच्या मागून जाणाऱ्या पायवाटेने पोबारा केला.
सदर महिला बारजाबाई राजीराम जांभूळे वय 66 वर्ष राहणार पांढरवाणी ही आज सकाळी नेरी तळोधी मार्गावरील सिरपूर च्या पहाडी जवळ रस्त्याच्या बाजूच्या शेतात भात पिकातील लांबा काढण्यासाठी शेतात आली होती ती एकटीच शेतात काम करीत होती तेव्हा 11 वाजताच्या दरम्यान एक अनोळखी चोर दुचाकीने तिथे आला शेतात एकटीच महिलेला बघून तो शेतात घुसला रस्त्यावर व आजूबाजूला कोणीही नसल्याचे बघून संधी साधून त्याने त्या महिलेला चाकू दाखविले आणि आरडाओरडा करू नको म्हणून चाकू तिच्या गळ्यावर लावला काही क्षणातच तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील सोन्याच्या बिऱ्या काढायला लावल्या आणि काडून घेताच दोन्ही दागीने हिसकावून दमदाटी करू लागला परंतु इतक्यात नेरीवरून एक दुचाकी येताना दिसताच महिलेला धीर आला आणि ओरडताच चोर तिथून पसार झाला स्वतः आणलेली दुचाकी क्र एम एच 31 सि एफ 616 या क्रमांकाची दुचाकी घटनास्थळी ठेवून पहाडी च्या माघून शिवनपायली गावा कडे जाणाऱ्या पाय वाटेने पसार झाला सदर घटनेची माहिती भ्रमणध्वनीव्दारे नेरी पोलिसांना मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सदर अनोळखी आरोपी ची दुचाकी जप्त करीत गुन्हा ची नोंद केली आणि अनोळखी आरोपी ची शोध मोहीम सुरू केली उपविभागीय पोलीस निरीक्षक शिंदे यांनी घटना स्थळाची पाहानी केली सदर घटनेचा पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय मंगेश मोहोड करीत आहेत.