उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट संघटने तर्फे फळ वाटप
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
दि.२५ सप्टेंबर २०२२ रविवारला वर्ल्ड फार्मसिस्ट डे निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय चिमूर यथे चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो.च्या वतीने गरीब गरजू रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.
या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय चिमूर चे वैद्यकीय अधिक्षक मा. डॉ.किन्हाके साहेब, वैद्यकीय अधिकारी डॉ.बेंडले साहेब, वैद्यकीय सेवा देणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉ.महेश खानेकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो.चे सन्माननीय अध्यक्ष मा. अजयभाऊ चौधरी, चिमूर तालुका सचिव मा. स्नेहदिपजी खोब्रागडे तसेच निळकंठजी लांडगे, देवभाऊ कडवे,अभयजी धोपटे, सौ. वर्षाताई शिवरकर,प्रशांतजी वैद्य,वैभवजी लांडगे,अमित चिचपाले आदि सभासद मंडळीनी परिश्रम घेतले.