माजी आमदार लहाने यांची परभणी लोकसभा समन्वयक पदी नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्याचे माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या परभणी लोकसभा समन्वयक पदी आज सोमवार ७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय भाऊराव मोरे यांनी मुंबई येथे माजी आमदार लहाने यांना नियुक्ती पत्र दिले.
या पत्रात म्हटले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा श्री. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्य लोकसभा समन्वयक पदी कार्यक्षेत्र परभणी लोकसभा नियुक्ती करण्यात येत – आहे.
सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल.वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे.
माजी आ लहाने यांच्या नियक्ती मुळे परभणी जिल्ह्यात नक्कीच बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला बळकटी मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यां मधून व्यक्त होत आहे.