ताज्या घडामोडी

अडेगाव( कोहळी) येथील दोन गायीला वाघाने केले ठार

दोन्ही दुधाळू गायी गेल्याने कुटुंबियांचा हातभार संपला

गावकऱ्यात दहशत

ग्रामीण प्रतिनिधी: रामचंद्र कामडी नेरी

नेरी वरून जवळ असलेल्या अडेगाव(को) येथे दि 26 ला सायंकाळ च्या सुमारास 2.30वाजता च्या सुमारास गावाजवळील मामा तलावाजवळ एका मोट्या पट्टेदार वाघाने चरत असलेल्या गायीनवर हल्ला चढविला यात दोन गाईना वाघाने ठार केले यामुळे गावकऱ्यांत व शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे
तालुक्यात वाघांच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली असून मानवावर तसेच प्राळीव प्राण्यावर सारखे हल्ले होताना दिसून येत आहेत त्यामुळे जंगल क्षेत्राला लागून असलेल्या ग्रामीण क्षेत्रात वाघाची दहशत निर्माण झाली आहे काल अडेगाव (को) येथील शेखर वासुदेव हांडेकर व माधव धर्म कोसे यांच्या मालकीच्या दोन गायींवर वाघाने हल्ला चढवून ठार केले सदर गायी ह्या जर्सी प्रजातीच्या प्रकारातील असून दुधाळू गायी होत्या दोन्ही गायी मामा तलावाजवळ चरत होत्या सोबत दहा बारा छोटे मोठे जनावरे चरत होती सायंकाळ च्या सुमारास पट्टेदार वाघ हा या जनावरांवर नजर ठेवून दबा धरून बसला होता अचानक काही कळायच्या आत त्याने गायींवर हल्ला चढविला आणि एका गायीला ठार करून लगेच दुसऱ्या सुद्धा हल्ला चढवून तिला सुद्धा ठार केले बाकी जनावरे सैरावैरा पळून गेले हे पळणारे जनावरे बघून गावकऱ्यां संशय आला आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली लोकांना पाहताच वाघ पसार झाला घटनेची माहिती वनविभागाला मिळताच या बिटाचे वनरक्षक श्रीकृष्ण नागरे आणि पी आर टी टीम प्रमोद बन्सोड शेखर हांडेकर कपिल कोसे सुभाष मसराम सुनील वलके घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून वनविभागा कडून नुकसानभरपाई देण्यात येईल असे आस्वासन देण्यात आले सदर गायी ह्या दुधाळू असून जर्षि प्रजाती च्या असून प्रत्येकी 70 हजार रुपये किमतीच्या होत्या ह्यामुळे गायी मालकाचे नुकसान झाले असून दुधापासून कुटुंबाचा प्रपंच चालायचा तो पण थांबला यामुळे गावात दहशत निर्माण झाली आहे तसेच दिवसा ढवळ्या वाघाने हल्ला केल्यामुळे शेतकरी वर्गात शेती कशी करावी हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे करिता वाघाचा बंदोबस्त करावा आणि नुकसानभरपाई गायी मालकांना देण्यात यावी अशी मागणी घटनास्थळी उपस्थित दीपक झोडे बालाजी झोडे विकास आळे तुकाराम भाकरे छगन भाकरे तसेच ग्रामस्थांनी केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close