ताज्या घडामोडी

ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट ,चंद्रपूर द्वारा जागतिक महिला दिन साजरा

महिला दिनानिमित्त भिक्खुनी धम्म संगीनी जिवनदान गौरव सत्कार समारंभ

मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे

भिक्खु निवास,पाली बुद्ध विहार, टेकडी, बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व आठ पैकी सात भिक्खुनी व सहा बाळांना जिवनदान देणारे पाच भंडारा सामान्य रुग्णालयातील सच्चे सैनिक उपस्थित होते. भिक्खुनी खेमा बल्लारपूर.भिक्खुनी संघमित्रा,भिक्खुनी खेमा,भिक्खुनी संघपाला,भिक्खुनी उपलवन्ना,सामणेरी शिलरक्षिता,सामणेरी संबोधी उपस्थित होत्या त्यांनी उपासक उपासिका तसेच भिक्खुनींना धम्म संगीनी विषयावर चर्चा केली व मार्गदर्शन केले.. त्यानंतर जिवनदान गौरव सत्कार करण्यात आला त्यात मान.अजित कुर्झेकर,मान.मनोज चिलगर,मान.बबन मानतुटे,मान.जितेंद्र टाले,मान.शिवम मडावी व मान.गौरव रेहपाडे.. भंडारा सामान्य रुग्णालयात ज्यांनी जन्म झालेल्या लहान बाळांना वाचविण्यासाठी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता अग्नी व धुरातुन कशा प्रकारे बाहेर काढले व त्या बाळांना जिवनदान कसे दिले याचे प्रत्यक्षदर्शी आलेला थरारदायक अनुभव सांगितला त्यात उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी आले..जिवनदान करणारे प्रत्यक्ष वीरांचे दर्शन झाले..या अशा ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजक व नियोजन मान.अल्काताई मोटघरे अध्यक्ष ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट चंद्रपूर.प्रमुख मार्गदर्शक प्रा.दुषंत नगराळे ,मान.उमरेताई,मान.पिपरेताई,मान.सत्यभामाताई भाले तसेच पाली बुद्ध विहार महिला संघ, उपासिका, अनेक मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक, बल्लारपूर उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान.मृणाल पाटील कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन मान.सुप्रियाताई चंदनखेडे ने केले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close