ताज्या घडामोडी

बल्हारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त!

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

बल्हारपूर तहसील कार्यालयाचे नियमीत तहसीलदार संजय विजय राईंचवार काल रविवार दि.३१जूलैला सेवानिवृत्त झाले. त्यांनी महसूल विभागात आपल्या कार्याची सुरुवात चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी निवडणूक शाखेतून टंकलेखक लिपीक म्हणून केली . शासकीय कामकाज हाताळीत असतांना सर्व सामान्य जनतेंशी त्यांनी सौजन्य पूर्वक वागणूक ठेवली अनेक वेळा ते कार्यालयातील नवोदित लिपीकांचे मार्गदर्शक ठरले‌.महसूल विभागातील त्यांचा अभ्यास दांडगा होता.शासकीय कामकाज करण्याची त्यांची एक वेगळी शैली होती.आपल्या टेबल वरील कुठलेही काम प्रलंबित राहणार नाही.याची ते जातीने दक्षता घेत असे.जनतेची ही कामे वेळेच्या आत करण्यात त्यांचा हातखंडा होता. राईंचवार यांनी सन २००९मध्ये सावली तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून काम बघितले त्यानंतर सन २०११मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तहसील कार्यालयाला संजय गांधी निराधार योजनेत नायब तहसीलदार म्हणून काम बघितले .त्यानंतर त्याच कार्यालयात सन २०१२मध्ये त्यांनी नियमीत नायब तहसीलदार म्हणून काम सांभाळले .मूल तहसील कार्यालयातून त्यांचे स्थानांतर झाल्या नंतर त्यांनी सन २०१७मध्ये संजय गांधी निराधार योजना चंद्रपूर येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून आपला पदभार सांभाळला.सन २०१९मध्ये त्यांनी चंद्रपूर येथे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काही काळ कार्यभार सांभाळला.या नंतर सन २०२०मध्ये नियमित तहसीलदार म्हणून त्यांनी बल्हारपूर तहसील कार्यालयाचे काम पाहिले. तहसीलदार संजय राईंचवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील मुळ रहिवाशी असून‌ ते एका शेतक-यांचे पुत्र आहे त्यामुळे साहजिकच त्यांना नेहमीच सर्व सामान्य जनते प्रमाणे शेतकऱ्यां विषयी नेहमीच सहानुभूती होती व आज ही त्यांचे मनात तेव्हढीच आहे . शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा त्यांनी अगदी जवळून अभ्यास केला आहे.शासकीय सेवेत असतांना राईंचवार यांचे वरिष्ठ अधिकारी वर्गांशी व कर्मचारी बांधवांशी आज पावेतो घनिष्ठ व चांगले संबंध राहिले आहे.राज्य महसूल कर्मचारी संघटना, पटवारी संघटना व मंडळ अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी व सदस्यांशी मधूर व गोड संबंध राहिले.नैसर्गिक आपत्ती , ग्राम पंचायत ते लोकसभा निवडणुकीचे कामे, तसेच शासकीय स्तरावरील विविध योजनांची कामे त्यांनी आपल्या कालावधीत व्यवस्थितरित्या हाताळली आहे.अनेक वेळा संजय राईंचवार यांचा जिल्हा स्तरावर गौरव देखिल झाला आहे.एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचे आज ही महसूल विभागात नांव घेतल्या जाते .हे विशेष!▪️कोरोना काळात जिल्हा कार्यालयातील‌ तहसीलदारांची तीन पदे रिक्त होती.त्याच वेळेस चंद्रपूरचे‌ तत्कालीन जिल्हाधिकारी खेमनार यांनी संजय राईंचवार यांचे कडे अतिरिक्त कार्यभार सोपविले .राईंचवार यांनी ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पडली .त्यांचे या कामाचे‌ मुल्यमापन करीत त्यांना १५ऑगष्ट २०२०रोजी जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांचे हस्ते कोरोना यौध्दा म्हणून गौरवित केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close