डॉ.प्रशांत राजनकर यांनी साधला अनेकांशी संवाद!

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
जी. एच. रायसोनी, रायसोनी सायखेडा ह्यांच्या नवीनच सुरु झालेल्या लर्निंग अँड डेव्हलपमेंट उपक्रमांतर्गत संस्थापक, ई एस एच फाऊंडेशन नागपूरचे डॉ. प्रशांत राजनकर ह्यांनी एका कार्यक्रमा अंतर्गत अनेकांशी संवाद साधला याच निमित्ताने त्यांना पहिला अतिथी वक्ता होण्याची संधी मिळाली. या वेळी त्यांनी कचरा व्यवस्थापन व हाताळणी, त्याचे आरॊग्यावर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम सोबतच निरोगी जीवनशैली ह्या विषयांवर उपस्थीत विविध विषयांचे प्रमुख आणि प्राध्यापक कर्मचारी ह्यांच्याशी संवाद साधत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यासाठी त्यांना प्रामुख्याने कुलगुरू डॉ. मीना राजेश, श्रीमती डीन-III सेल अंजू नायडू लर्निंग अँड डेव्हलपमेंट ऑफिसर अधिर ए.गोयल , या शिवाय लर्निंग अँड डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटर, प्रगती आसवले जी. एच. रायसोनी सायखेडा यांचे विशेष सहकार्य लाभले. दरम्यान ह्या कार्यक्रमाला उपस्थितांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.