ताज्या घडामोडी
वाढदिवसानिमित्त नेत्र शस्त्रक्रिया
उपसंपादकःविशाल इन्दोरकर
सौ वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या व अधीसेवीका यांचा,4 मार्चला ला वाढदिवस असतो त्यानिमित्ताने आपला वाढदिवस हा एखाद्या सामाजिक कार्याने करावा म्हणून पद्मश्री डॉ विकास महात्मे माजी खासदार राज्यसभा यांच्या नेत्र चिकित्सालयात सातरगावचे 17 लाभार्थीचे डोळ्यांचे आॅपरेशन करण्यात आले.हे सर्व आॅपरेशन पुर्णतः मोफत करण्यात आले .सोबत फळं वाटप करण्यात आले.या कार्याला मा .महात्मे साहेब यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले .त्याबद्दल वंदना विनोद बरडे यांनी त्यांचे आभार मानले.मा.. मधूकर काळमेघ साहेब,डाॅ विनोद बरडे सतिस बूरघाटे,अरूण खैरकार ,व संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले त्याबद्दल वंदना विनोद बरडे यांनी सर्वांचे आभार मानले व सामाजिक कार्याला हातभार लावला म्हणून सर्व टीमने वंदना बरडे यांना वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या.