ग्रीनफ्रेंड्स तर्फे 5 दिवसीय पक्षी व निसर्ग निरीक्षण कार्यक्रम
विद्यार्थ्यांनी केले विविध ‘बर्ड अँड बटरफ्लाय’ चे निरीक्षण
लागोपाठ 16 व्या वर्षी ग्रीनफ्रेंड्स तर्फे पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन
पक्षी पंधरवडा निमित्त केले आयोजन
प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी
भंडारा:-येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे पक्षी पंधरवडा व ‘जागतिक वन्यजीव संवर्धन दिना’च्या निमित्ताने 5 दिवसीय ‘पक्षी व निसर्ग निरीक्षण कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले.या 5 दिवसीय कार्यक्रमाला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास जिल्हा भंडाराचे (नेफडो)व अभा अंनिस जिल्हा तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडाराचे सहकार्य लाभले. पहिल्या दिवशी लाखनी तलाव येथे पक्ष्यांच्या विविध प्रजातीचे तसेच विविध फुलपाखरे ,विविध वेगळ्या प्रजातीचे किटक ,वनस्पती चे निसर्ग निरीक्षण जवळपास 3 तास करून त्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे,नेफडो तसेच अभाअंनिसचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी पक्षी निरीक्षक विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती देऊन त्यांच्यात भारताचे थोर पक्षीतज्ञ डॉ सलीम अली व मारुती चितमपल्ली यांच्या कार्याविषयी जाणीवजागृती यानिमित्ताने करण्यात आली. निसर्गमित्र पंकज भिवगडे,सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती अनेक विषारी बिनविषारी साप, जखमी प्राणी पक्षी यावर दिली.
यानंतर प्रगतिशील व उद्योगी शेतकरी इंजि. राजेश गायधने यांच्या तलावाला लागून असलेल्या सेंद्रीय शेतीला क्षेत्रभेट देण्यात आली.शेतात लावलेल्या औषधी व सुगंधीत वेखंड,अडुळसा,जैविक व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प, सेंद्रिय पाच प्रकारचे धान उत्पादन,सेंद्रिय सुरण व हळद इत्यादी पिकांचे निरीक्षण करण्यात आले.यानंतर ग्रीनफ्रेंड्सचा निसर्गमित्र विवेक बावनकुळे याच्या घरी विविध प्रकारचे पाळीव पक्षी,पोपट आणि कासव व त्यांचे खाद्य याविषयी प्रत्यक्ष भेट देण्यात आली.दुसऱ्या दिवशी लाखनी बसस्थानक ते मानेगाव तलाव या मार्गावर ‘बर्ड व बटरफ्लाय वॉच’ करण्यात आले. बर्ड व बटरफ्लाय वॉच नंतर अशोक लेलँड कंपनीत एका बंद कॅबिनमध्ये सापडलेल्या 2 नर मादी अजगराला केसळवाडा नजीकच्या जंगलात सोडण्यात निसर्गमित्र पंकज भिवगडे,विवेक बावनकुळे आणि नितीन निर्वाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोडण्यात आले.यावेळी शिबिरार्थीना विविध विषारी बिनविषारी सापांची माहिती चार्ट द्वारे देण्यात आली. तिसऱ्या दिवशी लाखनी बाजारसमिती परिसर ते अशोका बिल्डकॉन व लगतचा संजयनगर परिसरातील जैवविविधता आणि बर्ड- बटरफ्लायचे निरीक्षण करण्यात आले.यावेळी इंजि. नितेश नगरकर,सुरक्षा अधिकारी युवराज ठाकूर यांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन करून अशोका बिल्डकॉन परिसरातील रोपवाटिका, वृक्ष लागवड तसेच सिंचन सोयी आणि अनेक उपयोगी साहित्य दाखविले. चौथ्या दिवशी लाखोरी रोड परिसर तसेच सावरी तलाव येथे भेट देण्यात आली. यावेळी चार्टद्वारा फुलपाखरांची ओळख पटवून देण्यात आली पाचव्या दिवशी सातबंधारे व शेंदरे नर्सरी भागात पक्षी निरीक्षण करून पुस्तक,चार्ट तसेच फोटोद्वारे विविध पक्ष्यांच्या प्रजातीची ओळख करून देण्यात आली.
रात्रीला ग्रह, नक्षत्र राशी यांचा प्रत्यक्ष परिचय तसेच चार्टद्वारे करून देण्यात आला. अशा प्रकारे ग्रीनफ्रेंड्स च्या पाच दिवसीय बर्ड अँड बटरफ्लाय निरीक्षण उपक्रमात 50 पेक्षा जास्त पक्ष्यांची,20 पेक्षा जास्त फुलपाखरे त्याचप्रमाणे विविध किटक, साप, आणि प्राणी यांची ओळख तसेच जाणीव जागृती करण्यात आली.या पाचही दिवसात शिबीरार्थीनी लाखनी बसस्थानकावर ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे तयार करण्यात आलेल्या हिरवाईला पाणी देऊन श्रमदान केले.या शिबिरात ओंकार चाचेरे, यश लांजेवार,रेहान चाचेरे, श्रीनय चाचेरे,रोशन शेंडे, रोहित कुंभरे, मंथन चाचेरे, मयंक चाचेरे, दर्शन धारगावे,पंकज देशमुख, ओम आगलावे,आराध्या आगलावे यांनी सहभाग नोंदविला.
उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ.मनोज आगलावे,भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था भंडारा चे अध्यक्ष संजीव बावनकर ,अशोका बिल्डकॉनचे नितेश नगरकर,सोना वॉच अँड इलेक्ट्रॉनिक्स,नाना ऑप्टिकल्स,मनोज टहिल्यानी,अशोक लेलँडचे मुख्य इंजिनिअर एस. बी. जोशी, दीपक मेंढे,पंकज प-हाड, चंद्रकांत भुते,डॉ. मनोहर कांबळे,इन्स्पेक्टर नेताराम मस्के इत्यादींनी सहकार्य केले.