वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
आज दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2 ते 3 वाजता दरम्यान मौजा नेरी येथील महिला शेतकऱ्यांच्या शेतात कापूस वेचणी करत असताना नेरी पासून दोन किमी अंतरावरील रामपूर बस स्टॉप पासून अवघ्या अर्धा किमी अंतरावर लगतच्या जंगलामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला करून जखमी केले. सोबत असणाऱ्या महिलांनी आरडाओरडा करताच वाघ पळून गेला. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव रीना हरिचंद्र जांभुळे वय 30 वर्ष राहणार नेरी वार्ड क्रमांक 1 असे असून जखमी महिलेला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे दाखल करण्यात आले. जखमी महिलेवर डॉक्टर डांगे यांनी उपचार करून तिच्या अंगावर जागोजागी असणाऱ्या जखमा, उजव्या हात, उजवामनगट, पाठ, खांदा व इतर ठिकाण असे 14 टाके लावून औषधोपचार करून जखमी महिलेला घरी पाठवण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी रासेकर उपस्थित झाले. त्यांनी पंचनामा व चौकशी करून पाठविले. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. आजच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे. सदर जखमी महिलेला उपचाराकरिता आर्थिक मदत मिळावी ही मागणी जनतेमध्ये जोर धरत आहे.